'हिंदू दहशतवाद' हा शब्द शरद पवारांचं सर्वात मोठं पाप : सुनील देवधर

MNS on Sharad Pawar PM Modi Meeting
MNS on Sharad Pawar PM Modi Meetingesakal
Updated on

सध्या राज्यात महाविकास आघाडी सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. तर काही दिवसांपुर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाडवा मेळाव्यात बोलताना शरद पवारांवर जातीवादाचे आरोप केले होते. आता भाजपचे नेते सुनील देवधर (Sunil Deodhar) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांनी 'हिंदू दहशतवाद' या शब्दासाठी जबाबदार ठरवलं आहे, हिंदू दहशतवाद हा शब्द पवार यांचं देशातील सगळ्यात मोठं पाप असल्याचा आरोप केलाय.

शरद पवार यांचं सर्वात मोठे पाप 'हिंदू दहशतवाद!' हा शब्द प्रतलित करणे आहे. मालेगाव बॉम्बस्फोटानंतर राष्ट्रवादीच्या 'चिंतन' शिबिरमध्ये त्यांनी विचारले की, मुस्लिम शुक्रवारी असे कृत्य कसे करू शकतात? 'हिंदू टेरर' असा खोटा सिद्धांत मांडण्यासाठी त्यांनी एटीएसला हिंदू नेत्यांना पकडण्यासाठी चिथावणी दिल्याचे म्हटले आहे. त्यांनी पुढे, "कोल्हापूर ईव्हीएममधून उत्तर देईल" असे देखील म्हटले.

त्यानी स्वतःच्या भाषणाची एक व्हिडीओ क्लिर ट्विटरवर पोस्ट केली आहे. ज्यामध्ये ते म्हणाले की, 'पवार साहेब, ज्यांनी या देशातमध्ये खूप मोठं केलेलं पाप म्हणजे हिंदू दहशतवाद नावाचा एक शब्द, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अलिबाग येथे झालेल्या बैठकीत त्यांनी म्हटलं सगळीकडं मुसलमानच कसे बॉम्ब ब्लास्ट करतात, शुक्रवारच्या दिवशी मालेगावात मुसलमान कसे बॉम्ब ब्लास्ट करु शकतात, त्यामुळं नक्की काहीतरी दुसरा अँगल असला पाहीजे असे विधान त्यांनी केलं" असं ते म्हणाले.

MNS on Sharad Pawar PM Modi Meeting
सुप्रिया सुळेंसोबतच्या व्हिडिओवर शशी थरूर यांचं स्पष्टिकरण, म्हणाले..

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, शरद पवार यांच्या त्या विधानामुळे पोलिसांवर दुसरा अँगल शोधण्यासाठी पोलिसांवर दबाव आल्याचा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले की, "..त्यामुळे अँगल शोधण्यासाठी पोलिसांवर, एटीएसवर दबाव आला आणि त्यामुळे हिंदू दहशतवाद नावाचा चूकीचा शब्द... हिंदू कधीही दहशतवादी असू शकत नाही" असे ते या वेळी म्हणाले.

MNS on Sharad Pawar PM Modi Meeting
योगींविषयी अक्षेपार्ह विधान; सपा आमदाराच्या पेट्रोल पंपावर चालला बुलडोझर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.