Sharad Pawar: राष्ट्रवादी शिवरायांचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळते, कारण…; भाजपचा शरद पवारांवर निशाणा

bjp target ncp sharad pawar Jitendra awhad over chhatrapati shivaji maharaj statement
bjp target ncp sharad pawar Jitendra awhad over chhatrapati shivaji maharaj statement Esakal
Updated on

राज्यातील मागील काही दिवसांपासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेंदी यांच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वागग्रस्त व विधानावरून राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. या नंतर भाजपवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती, यानंतर आता भाजपकडून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल झालेल्या वादग्रस्त विधानानंतर भाजपने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपकडून याबद्दल ट्विट करण्यात आलं आहे.

"राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करते, असा भासवण्याचा प्रयत्न करत आहे. खरं तर राष्ट्रवादी कॉंग्रेस छत्रपती शिवाजी महाराजांचा नेहमीच विरोध करत आली आहे. तसं राष्ट्रवादी कॉंग्रेसने खाली सांगितलेल्या कृतीतूनही दाखवून दिलं आहे." असं म्हटलं आहे.

हेही वाचा - Elon Musk Takeover Twitter : ट्विटरची टिवटिव थांबणार का?

bjp target ncp sharad pawar Jitendra awhad over chhatrapati shivaji maharaj statement
UP Politics : नादच खुळा! 'I Love U Dimpal Bhabhi' अंगावर लिहून कार्यकर्त्याचा सायकलने 700 किमी प्रवास

भाजपने म्हटले आहे की, "मविआ सरकार स्थापन झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने असणाऱ्या योजनांची नावे बदलण्यात आले. हा महाराष्ट्र शाहू - फुले - आंबेडकरांचा आहेच यात कोणतंही दुमत नाही. पण, तीन महापुरुषांचे नाव घेताना NCP कडून जाणीवपूर्वक छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख टाळला जातो. कारण, जितेंद्र आव्हाडांसारखे अफजल प्रेमी नाराज होतील या भीतीने.ठ

"राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा कायम स्टेजच्या खाली लावली जाते. कारण; शरद पवारांना राष्ट्रवादीचे नेते जाणता राजा म्हणून हाक मारतात"

bjp target ncp sharad pawar Jitendra awhad over chhatrapati shivaji maharaj statement
Suryakumar Yadav : बाबर अझमला देखील SKY चे वर्चस्व मान्य; फोटो ट्विट करत म्हणाला…

"राज्यात आणि केंद्रात शरद पवार यांनी अनेक मंत्रीपदे उपभोगली. पण; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारे गड किल्ल्यांची दुरावस्था त्यांना थांबवता आली नाही. पण, शरद पवारांच्या काळात औरंगजेब, अफजलच्या कबरी मात्र सुरक्षित जतन करून ठेवल्या" असा आरोपही भाजपकडून करण्यात आला आहे.

"मागील देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात गड किल्ले संवर्धनासाठी "रायगड प्राधिकरण" स्थापन करण्यात आल होत. पण, मविआ सरकार सत्तेत आल्यानंतर प्राधिकरणाचे महत्व कमी करून निधी थांबवण्यात आला. आज हे महाराजांच्या नावाचा वापर करून राजकीय पोळी भाजून घेण्याच्या प्रयत्न करत आहेत" असेही भाजपने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.