- संतोष शालिग्राम
मुंबई: मागच्या आठवड्यात अहमदनगर (Ahmednagar) येथील रुग्णालयात आयसीयू कक्षाला आग (Icu fire) लागून ११ रुग्णांचा मृत्यू झाला होता. या घटनेवरुन राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. संजय राऊत (Sanjay raut) यांनी या आगीवरुन केंद्राला लक्ष्य केल्यानंतर आता महाराष्ट्र भाजपाच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra wagh) यांनी संजय राऊत यांना उत्तर दिलं आहे.
"सर्वज्ञानी संजय राऊत नगरच्या आगीच खाप केंद्रावर फोडत आहे. पण व्हेंटिलेटर नव्हे संजय राऊत यांची मानसिकताच निकृष्ट बनलीय" अशी जळजळीत टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.
"डॉक्टर, नर्स यांना बडतर्फ करण्यात सरकार कोणता पुरुषार्थ दाखवतेय. नगर दुर्घटना ही दुर्देवी घटना आहे. हे सरकारी अनास्थेचे बळी आहेत. डॉक्टर आणि काही नर्सला बडतर्फ केले. त्यांचे हे कामच नाही. कारवाई करायची असले, तर वैद्यकीय अभ्यासक्रमात आग नियंत्रणाचा समावेश करा" असे चित्रा वाघ म्हणाल्या.
"PWD वर प्रश्नचिन्ह का नाही. डॉक्टर बडतर्फ होत असेल, तर मंत्री का नाही? या प्रश्नी श्वेतपत्रिका काढा. भंडाऱ्याच्या घटनेनंतर सरकारी रुग्णालयाचे ऑडिट करू असे आश्वासन दिले होते. पण केले नाही. सरकार फक्त खंडणी गोळा करतेय" अशी टीका चित्रा वाघ यांनी केली. "अकरा लोकांचे बळी घेऊनही सरकारची भूक शमलेली नाही. एक वर्ष जुनी इमारत असूनही आग कशी लागते" असा सवाल त्यांनी केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.