Ramdas Tadas : सुनेच्या आरोपांना भाजप खासदार रामदास तडस यांचं प्रत्युत्तर; निवडणूक लढवण्याच्या चर्चेवरही दिलं उत्तर

''ती आमच्याकडे राहातही नाही.. तिने तिच्या नवऱ्यापाशी राहावं. मला काही देणंघेणं नाही. विरोधकांना हाताशी धरुन राजकारण केलं जात आहे. निवडणुका जवळ आल्या की हे मुद्दे उपस्थित केला जातात. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे मी जास्त बोलू शकत नाही.''
Ramdas Tadas
Ramdas Tadasesakal
Updated on

मुंबईः ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी वर्ध्याचे भाजप खासदार रामदास तडस यांच्या सुनेवर होणाऱ्या अन्यायाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद बोलावली होती. यावेळी अंधारेंनी 'मोदी का परिवार' या टॅगलाईनवरुन भाजप आणि पंतप्रधान मोदींवर टीका केली. खासदार तडस यांच्या सून पूजा तडस यांच्या आरोपांना रामदास तडस यांनी उत्तर दिलं आहे.

पूजा तडस यांचे आरोप काय?

खासदार रामदास तडस यांच्या सून तथा पंकज तडस यांच्या पत्नी पूजा तडस यांनी तडस कुटुंबियांवर गंभीर आरोप केले आहेत. कुटुंबियांकडून मला लोखंडी रॉडने मारहाण झालेली आहे, माझ्या मुलाची डीएनए टेस्ट करण्यासाठी मला सांगितलं जातंय आणि मला घरातून बेदखल केलं गेलं, असे गंभीर आरोप त्यांनी केले.

Ramdas Tadas
VIDEO: मृण्मयीने खाल्ला आईचा ओरडा; देशपांडे सिस्टर्सचा व्हिडीओ पाहून खळखळून हसाल

रामदास तडस यांचं प्रत्युत्तर

पूजा तडस यांची पत्रकार परिषद सुरु असतानाच खासदार रामदास तडस यांनी फोनवरुन माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, निवडणुका आल्या की असे आरोप केले जातात. मुलगा आणि मुलीने लग्न केल्याचं मला माहिती नव्हतं, आम्हाला लग्नाला बोलावलंही नव्हतं. या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही.

खासदार तडस पुढे म्हणाले की, ती आमच्याकडे राहातही नाही.. तिने तिच्या नवऱ्यापाशी राहावं. मला काही देणंघेणं नाही. विरोधकांना हाताशी धरुन राजकारण केलं जात आहे. निवडणुका जवळ आल्या की हे मुद्दे उपस्थित केला जातात. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे मी जास्त बोलू शकत नाही.

Ramdas Tadas
US Astrology Influencer: पतीला भोसकलं, अन् चालत्या कारमधून लहान मुलांना दिलं फेकून.. ग्रहणाच्या भीतीने अमेरिकन इन्फ्लुएन्सरचं कृत्य

दरम्यान, पूजा तडस ह्या अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याची चर्चा आहे. या प्रश्नावर खासदार रामदास तडस म्हणाले, जे कधी नगरसेवक पदावर निवडून येऊ शकत नाहीत, ते आता खासदारकी लढवणार आहेत. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणुका लढवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्यांनी निवडणूक लढवली तरी माझी काही हरकत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.