सध्या राज्यात लोकसभेच्या निवडणुकीसाठीची जोरदार तयारी पक्षांनी सुरू केली आहे. अशातच महायुती सरकारमध्ये जागा वाटपाच्या चर्चा सुरू असल्याची माहिती आहे, दरम्यान दक्षिण मुंबईतील लोकसभा मतदार संघात एकनाथ शिंदेंकडे तगडा उमेदवार नसल्याने ही जागा भाजपला सोडणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
भाजपकडे या लोकसभा मतदार संघात शिवसेनेच्या अरविंद सावंत विरोधात तीन उमेदवार आहेत. यामध्ये राहुल नार्वेकर, मंगलप्रभात लोढा आणि राजपुरोहित याचे नाव चर्चेत आहे. भाजपसाठी यंदाची लोकसभा निवडणुक ही अतिमहत्वाची असल्याने एक एक जागेवर भाजपकडून जातीने लक्ष घालून उमेदवार निवडले जाणार आहेत.
भाजपने तर या चारही लोकसभा मतदार संघात कामे व मोर्चेबांधणीही सुरू केल्याची माहिती आहे. त्यामुळे शिवसेनेसाठी दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई या दोनच जागा लढवणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
लोकसभा निवडणूक जानेवारी २०२४ मध्ये होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी भाजपसह सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केला आहे. मुंबई शहर व उपनगरात दक्षिण मुंबईसह दक्षिण मध्य मुंबई, उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई व ईशान्य मुंबई असे सहा लोकसभा मतदारसंघ आहेत.
दरम्यान, दक्षिण मुंबईत शिवसेना (शिंदे गटा)कडे तगडा उमेदवार नसल्यामुळे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच या मतदारसंघातून माघार घेतल्याच्या चर्चा सुरू आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.