Crime News: धक्कादायक! केंद्रीय मंत्र्याच्या घरात एका व्यक्तीची गोळी झाडून हत्या, घटनास्थळावरून मुलाचे पिस्तूल जप्त

बेगरियामधील गावात कौशल किशोर यांच्या घरात ही घटना घडली आहे
Crime News
Crime NewsEsakal
Updated on

केंद्रीय मंत्र्याच्या घरात एका व्यक्तीची हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. कौशल किशोर हे उत्तर प्रदेशच्या मोहनलाल गंज जागेवरुन लोकसभा खासदार आहेत. त्यांच्या लखनऊ येथील निवासस्थानी एका युवकाची हत्या करण्यात आली आहे. मृत युवकाची ओळख पटवण्यात आली असून त्याच नाव विनय श्रीवास्तव आहे.

केंद्रीय राज्यमंत्री आणि उत्तर प्रदेशातील मोहनलाल गंज मतदारसंघाचे खासदार कौशल किशोर यांच्या लखनऊच्या घरी या तरुणाची हत्या करण्यात आली आहे. विनय श्रीवास्तव असे मृत तरुणाचे नाव आहे. विनय हा कौशल किशोर यांचा मुलगा विकास किशोर याचा मित्र असून त्याच्यासोबत राहत होता. पोलिसांनी घटनास्थळावरून सरकारी परवाना असलेले पिस्तूल जप्त केले आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून तपास सुरू केला आहे.

Crime News
Nuclear Power Plant: भारताचा पहिला स्वदेशी अणुऊर्जा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरु; पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन

ठाकूरगंज पोलीस स्टेशन हद्दीतील बेगारिया गावात केंद्रीय राज्यमंत्री कौशल किशोर यांच्या निवासस्थानी ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. येथे विनय श्रीवास्तव यांची पिस्तुलाने गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. पश्चिम डीसीपी राहुल राज, एडीसीपी चिरंजीव नाथ सिन्हा यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. कुटुंबीयांनी हत्येची फिर्याद दिली आहे.

Crime News
One Nation One Election: इंडियाच्या बैठकीला घाबरून 'एक देश एक निवडणूक' प्रयत्न सुरू; वड्डेटीवार यांची टीका

डीसीपी पश्चिम लखनऊ राहुल राज यांनी सांगितले की, गोळी लागल्याने विनय श्रीवास्तवचा मृत्यू झाला. तसेच डोक्यावर जखमेची खूण आहे. हे पिस्तूल विकास किशोरचे असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. फॉरेन्सिक टीम तपास करत आहे. याशिवाय सीसीटीव्ही बसवले आहेत. त्यांचे फुटेजही तपासले जात आहे. नातेवाइकांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेवर कौशल किशोर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, मला घटनेची माहिती मिळाली आहे, त्यामुळे पोलिस आयुक्तांना फोनवरून माहिती दिली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. आम्ही पीडित कुटुंबासोबत आहोत. पोलीस आपलं काम करतील. मुलगा घटनास्थळी उपस्थित नव्हता. त्याच्याकडून पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. पोलीस त्याचा तपास करत आहेत.

Crime News
One Nation One Election: 'एक देश एक निवडणूक' होणारच? माजी राष्ट्रपतींच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.