केंद्र सरकारने शनिवारी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात अनुक्रमे आठ आणि सहा रुपयांनी कपात केली. याशिवाय प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या नऊ कोटींहून अधिक लाभार्थ्यांना प्रति गॅस सिलिंडर २०० रुपये सबसिडी देण्याची घोषणा केली. यानंतर महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सदस्या, शिवसेनेच्या उपनेत्या प्रियांका चतुर्वेदींनी (Priyanka Chaturvedi) भाजपवर (BJP) निशाणा साधत ‘झुकते सरकार, झुकवणारा पाहिजे, शेवटी देशवासीयांचे दुख समजले’ असे ट्विट केले होते. याला भाजप महाराष्ट्र या ट्विटर हँडलवरून उत्तर देण्यात आले. (BJPs reply to Priyanka Chaturvedi We bow before the countrymen)
अनेक दिवसांपासून पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलिंडरचे दर सातत्याने वाढत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना चांगलाच फटका बसत आहे. नागरिकांना महागाईच्या खाईत ढकलला जात असताना केंद्र सरकार यावर काहीही बोलत नसल्याची टीका विरोधकांकडून केली जात होती. भाजपच्या राज्यात हेच पाहायला मिळणार असेही बोलले जात होते.
अशात केंद्र सरकारने (BJP) पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलिंडरवरील दर कमी करण्याचा निर्णय घेतल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. याचे नागरिकांकडून स्वागत केले जात आहे. मात्र, महाविकास आघाडीसरकारमधील मंत्री हसत आहे. आधी मोठ्या प्रमाणात दर वाढवायचे नंतर कमी करून नागरिकांना खून करण्याच प्रयत्न करायचा, असे म्हणत आहे.
यालाच धरून ‘झुकते सरकार, झुकवणारा पाहिजे, शेवटी देशवासीयांचे दुख समजले’ असे ट्विट शिवसेनेच्या उपनेत्या प्रियांका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी केले होते. याला त्यांच्या ट्विटला भाजप महाराष्ट्र या ट्विटर हँडलवरून उत्तर देण्यात आले. ‘पण ठाकरे सरकार दाऊद, माफिया आणि सोनियाजींपुढे झुकते! ती जनतेसमोर कधी झुकणार? ठाकरे सरकार महाराष्ट्रातही भाव कमी करणार का? की घरात बसून उद्धवजींना जनतेचा आवाज ऐकू येत नाही!!’ असे ट्विटद्वारे म्हणत उत्तर देण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.