Eknath Shinde :एकनाथ शिंदे भाजपला नकोसे झाल्याची चर्चा; भाजपमधील वरिष्ठ नेते मुख्यमंत्र्यांवर नाराज?

आगामी काळात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगली
Eknath Shinde
Eknath Shindesakal
Updated on

राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असतानाच आता वेगवेगळ्या चर्चा, तर्क वितर्क यामुळे राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. अशातच राज्यातील मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली सुरू असल्याचे काही नेत्याने सांगितल्यानंतर आता भाजपमधील वरिष्ठ नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाराज असल्याची चर्चा आहेत. (marathi Political News)

तर एकनाथ शिंदे भाजपला नकोसे झाले असल्याचं देखील बोललं जात आहे. विरोधकांकडून मुख्यमंत्री नाराज असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे आगामी काळात मुख्यमत्री बदलाच्या शक्यता असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या घडामोडी घडत असल्याचे संकेत दिसून येत आहेत. मुख्यमंत्री बदलणार असल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरू आहे. अशातच मुख्यमंत्री गेल्या दोन दिवसांपासून सातारा दौऱ्यावर आहेत. ते नाराज असल्यामुळे गावी गेल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात येत आहेत. तर मुख्यमंत्र्यांच्या सुट्टीबाबत पक्षातील नेत्यांमध्ये संभ्रम दिसून आले तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर वेगळंच त्यामुळे या चर्चांना अधिक बळ मिळालं आहे.(Political News)

Eknath Shinde
Accident News: चालकाचे नियंत्रण सुटल्याने शिवशाही बसला भीषण अपघात; १ ठार तर २२ प्रवासी जखमी

दरम्यान दिल्लीतील भाजपचे वरिष्ठ नेते एकनाथ शिंदेसंदर्भात फारसे खुश नसल्याचं देखील बोललं जात आहे. तसेच आमदार अपात्रतेचा निर्णय आल्यास राजीनामा तयार ठेवा असं शिंदेंना दिल्लीतून सांगण्यात आलं असल्याची माहिती 'साम' या वृत्तवाहिनीने दिले आहे.

Eknath Shinde
Nana Patole: महाविकास आघाडीत बिघाडी? '...तर आमचा प्लॅन तयार', नाना पटोलेंचं सूचक वक्तव्य

एकनाथ शिंदे याच्यावर नाखुश असण्याची राजकीय वर्तुळात चर्चेत असलेली कारणं

एकनाथ शिंदे यांना मराठा नेता म्हणून जनतेवर हवी तशी छाप सोडता आली नाही. तर बंड केल्यानंतर राज्यात उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळत असल्याचं चित्र दिसून येत आहे. शिंदेंना सोबत घेऊन पुढील निवडणुकी लढल्यास भाजपला जास्त फायदा होणार नाही. ग्रामपंचायत आणि नगरपरिषदांसारख्या निवडणुकांत शिंदे अधिक छाप पाडू शकले नाहीत. सत्तेत आल्यानंतर एकनाथ शिंदे लोकाभिमुख निर्णय घेत नसल्याचीही ओरड. वेदांता फॉक्सकॉन, खारघर दुर्घटनेनंतर एकनाथ शिंदे एकाकी पडल्याचं चित्र दिसून येत आहे.

Eknath Shinde
Sharad Pawar: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट रद्द

भाजपने एकनाथ शिंदे यांना सोबत घेतले तेव्हा त्यांच्या अपेक्षा अशा होत्या की एक मराठा नेता आपल्यासोबत येत आहे. याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातलं राष्ट्रवादी काँग्रेसला तोडून ते तिथे भाजपला मदत करतील अशी चर्चा झाली असल्याची माहिती आहे. मात्र ठाणे आणि पालघर याच्या पलिकडे एकनाथ शिंदे जाऊ शकलेले नाही असे चित्र आहे. त्यामुळे त्यांच्यावर नाराजी असल्याचे बोललं जात आहे. (Marathi Latest Political News)

Eknath Shinde
Amit Shah: राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा सुरु असतानाच CM शिंदे अमित शहांना भेटणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()