भोकर ( जिल्हा नांदेड ) : देशात भाजप सरकार स्व: हिताच राजकारण करुन सामान्य जनतेला छळते आहे. राज्यातील आघाडी सरकार लोकहिताची कामे करुन विकासाकडे वाटचाल करीत आहे. केंद्राकडून मदत करताना मात्र हात आखूडता घेत आहेत. दिडवर्षात महाआघाडी सरकारला मिळालेल यश भाजपच्या डोळ्यात खुपत आहे असे प्रतिपादन पालकमंत्री अशोक चव्हाण यानी सोमवारी (ता .१४) केले आहे.
भोकर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन ईमारतीचा लोकापर्ण सोहळा आयोजित केला होता त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर माजीमंत्री डी. पी. सावंत, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबूलगेकर, जिल्हाध्यक्ष गोविंद शिंदे नागेलीकर, सभापती जगदीश पाटील भोसीकर, कृषी सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर, प्रकाश देशमुख भोसीकर, विनोद पाटील चिंचाळकर, शेख यूसुफ, सुभाष किन्हाळकर, नागनाथ घिसेवाड, गोविंद पाटील गौड, भगवान दंडवे, सूभाष पाटील कोळगावकर, गणेश राठोड, वानंद धूत, पी. जी.पुजेकर, रामचंद्र मुसळे, विठ्ठल धोंडगे, विक्रम क्षिरसागर, बाबूराव आंदबोरीकर, अॅड. शिवाजी कदम, ताहेरबेग याची उपस्थिती होती.
श्री.चव्हाण म्हणाले की, तालूक्यातील शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून बाजार समितीने अनेक हितांचे निर्णय घेतले आहेत. नव्याने उभारण्यात आलेल्या बाजार समितीला कै. शंकरराव चव्हाण याच नाव दिलं आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी पारदर्शी कारभार करुन मराठवाड्यात नावलौकिक मिळवावा तरच त्यांच्या नावाच सार्थक होईल. भाजप सरकार शेतकरी आणि जनतेच्या हिताचे निर्णय घेताना लबाडी करीत आहे. शेतकरी विरोधी कायदा करुन कष्टकरी बळीराजाची थट्टा करते आहे.
मोठे व्यापारी व उद्योगपतीना बळ मिळत असल्याने शेतकरी पिचल्या जात आहे. महाआघाडी सरकार तर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आमच्या शिष्टमंडळानी भेट घेऊन मराठा आरक्षणासह विविध विकासात्मक कामाबाबत सविस्तर चर्चा केली आहे. या संदर्भात ते काय निर्णय घेतील हे पाहणं गरजेच आहे. असे श्री.चव्हाण यांनी सांगीतले आहे. सभापती जगदिश पाटील भोसीकर यानी प्रास्ताविक तर संतोष देवराय यानी सुत्रसंचालन केले असून सचिव पी.जी. पूजेकर यांनी आभार मानले आहे.
आम्ही करुन दाखवतो
भोकर विधानसभा मतदारसंघासाठी सुमारे एकसे ब्यानव कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.याऊपरहि आणखी विकासासाठी निधीची गरज भासल्यास तो हि मिळून देण्यासाठी मी तयार आहे. आमूक आम्ही केलं तमुक आम्ही केलं असं म्हणणारे लय झालेत त्यांच्यापासून सावध रहा.मी बोलतो ते करून दाखवतो नूसतेच नारळ फोडत नाही असं श्री.चव्हाण म्हणाले.
झुकत माप
शहरातील रस्ते चकचकीत व्हावे म्हणून पालिकेला सतरा कोटी रुपयाचा निधी दिल्याने कामे पूर्ण झाले आले. एमआयडीसीच्या जागेवर व्यापारी संकूल ऊभारण्यात येईल. भोकर- मूदखेड आणि भोकर- रहाटी महामार्ग रस्ता सीसीरोड (सिंमेट रस्ता) करण्यासाठी दोनसे कोटी, दत्तगडावरील सूशोभीकरणासाठी एक कोटी रुपये असा निधी देण्यात आला आहे. शहरातील रेल्वे ऊड्डाण पुलाचे रखडल्याने नागरीकाची गैरसोय होत आहे, ते काम दोन महिन्यात पूर्ण करण्याच्या सुचना संबधीत अधिका-याना दिल्या आहेत असे श्री. चव्हाण यानी सांगितले आहे. शहरात नवीन झालेल्या जिल्हापरीषद बांधकाम विभागाच्या कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
संपादन- प्रल्हाद कांबळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.