Blue Whale Game: 'ऑनलाईन गेम'ने घेतला मुलाचा जीव; चिंचवडमध्ये मुलाने उचललं टोकाचं पाऊल

Pimpri Chinchwad News: मागील सहा महिन्यांपासून आर्य हा ऑनलाईन गेमच्या आहारी गेला होता. 'ब्लू व्हेल'सारखा धोकादायक गेम खेळून तो प्रचंड आक्रमक झाल्याचं सांगितलं जातंय. या गेमसाठी तो तासन्तास स्वतःला आपल्या घरातील सदनिकेत कोंडून घ्यायचा...
Blue Whale Game
Blue Whale Gameesakal
Updated on

Crime News: मागच्या काही वर्षांपासून ऑनलाईन गेम्सने किशोरवयीन मुलांचं भावविश्व व्यापून टाकलं आहे. अशा गेम्सच्या नादापायी मुलं जीवानिशी जात आहेत. अशीच एक घटना पुण्यातल्या पिंपरी चिंचवड येथे घडली आहे. एका पंधरा वर्षीय मुलाने चौदाव्या मजल्यावरुन उडी मारुन जीव दिला.

पिंपरी चिंचवड शहरातील किवळे परिवारातील रुणाल गेटवे सोसायटीत 25 जुलैच्या रात्री ही घटना घडली. आत्महत्या केलेल्या मुलाचं वय पंधरा वर्षे आहे. तो अत्यंत लाजाळू आणि अभ्यासू मुलागा होता, असं सांगितलं जातंय. चिंचवडमधील नामांकित स्कूलमध्ये दहावीच्या वर्गात तो शिक्षण घेत होता.

Blue Whale Game
Aaditya Thackeray: ''राज्यात लाडका कॉन्ट्रॅक्टर योजना'' महामार्गांवरील खड्ड्यांवरून आदित्य ठाकरेंचं थेट गडकरींना 'चॅलेंज'

मागील सहा महिन्यांपासून तो मुलगा ऑनलाईन गेमच्या आहारी गेला होता. 'ब्लू व्हेल'सारखा धोकादायक गेम खेळून तो प्रचंड आक्रमक झाल्याचं सांगितलं जातंय. या गेमसाठी तो तासन्तास स्वतःला आपल्या घरातील सदनिकेत कोंडून घ्यायचा. कधीकधी तर तो दोन-तीन दिवस स्वतःला आपल्या खोलीत बंद ठेवत असायचा. या गेममुळेच त्याने 25 जुलैच्या रात्री त्याच्या राहत्या घरातून चौदाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. 'साम टीव्ही'ने वृत्त दिले आहे.

मुलगा आपल्या आईसोबत किवळे येथील रूणाल गेटवे सोसायटीमध्ये राहायचा. त्याचे वडील हे विदेशात नोकरीसाठी वास्तव्यास आहेत. या घटनेमुळे त्याच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणात रावेत पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मात्र या घटनेमुळे पिंपरी चिंचवड शहरात मोठी खळबळ उडाली.

Blue Whale Game
Patanjali Coronil: 'कोरोनिल'बाबत तीन दिवसांत...; हायकोर्टाचा बाबा रामदेव यांना पुन्हा झटका

ब्ल्यू व्हेल, पब जी सारख्या जीवघेण्या ऑनलाइन गेमवर बंदी असताना सुद्धा हे गेम लहान मुलांच्या मोबाईलमध्ये कसे इंस्टॉल होतात आणि यावर सरकार निर्बंध का आणत नाही ? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com