BMC poll | मुंबई महानगरपालिका भाजप स्वतंत्र लढणार; समोर आले मोठे कारण

मुंबई महानगरपालिकेची आगामी निवडणूक दरवर्षी पेक्षा वेगळी आणि निर्णायक ठरणार आहे.
BMC Election
BMC Election esakal
Updated on

मुंबई महानगरपालिकेची आगामी निवडणूक दरवर्षी पेक्षा वेगळी आणि निर्णायक ठरणार आहे. कारण राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांचा परिणाम या येत्या महानगरपालिका निवडणुकांवर दिसणार आहेत. अशातच नोव्हेंबरमध्ये महापालिका निवडणुका होणार असल्याची माहिती शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात दिली आहे. तसेच, मुंबई महानगरपालिका भाजप स्वतंत्र्य लढणार असल्याची माहितीही समोर आली आहे. (BMC Election 2022 CM Eknath Shinde Raj Thackeray BJP Devendra Fadnavis Shivsena maharashtra political crisis )

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदे आणि मनसे यांची युती होणार आहे. तर भाज स्वबळावर लढणार असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपमुळं शिंदे गटाची मत फुटू नयेत आणि मनसेमुळे भाजपची उत्तर भारतीय मतं फुटू नयेत. म्हणून हा युतीचा प्लॅन बनवण्यात आलं असल्याची माहिती समोर आली आहे.

BMC Election
Sanjay Shirsat |वर्षावरील स्नेहभोजनाचे निमंत्रण शिरसाटांनी नाकारलं? म्हणाले, 'शिंदेंनी...'

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदे आणि मनसे यांची युती होणार आहे. तर भाज स्वबळावर लढणार आहे. अशातच राज ठाकरे आज मुख्यमंत्री शिंदे यांच्या गणरायाच्या दर्शनासाठी त्यांच्या वर्षा बंगल्यावर उपस्थिती लावणार आहेत. त्यामुळे शिंदे-मनसे युतीच्या चर्चेला उधाण आलं आहे.

मुंबई महापालिका निवडणूकीच्या अनुशंगाने प्रमुख पक्ष आता मोर्चे बांधणीच्या कामाला लागले आहेत. दरम्यान, मुंबई महापालिकेतील 150 जागांवर शिवसेनेचे नगरसेवक असणार असा निर्धार किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केला होता. तर केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी देखील 150 चे टार्गेट येथील पदाधिकारी आणि आमदारांना दिले आहे. एवढेच नाहीतर पुढचा महापौर हा भाजपचाच असावा अशा सूचना त्यांनी बैठकीत दिल्या आहेत.

BMC Election
Eknath Shinde : मधल्या काळात बरंच काही घडू शकतं; शिंदेंच्या विधानानं सस्पेन्स आणखी वाढला

शिवसेनेतील बंडानंतर शिंदे गटाने आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आहे. या गटात मुंबईतील आमदारांचाही समावेश आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणूकांमध्ये शिंदे गट आणि भाजप एकत्र लढून शिवसेनेला एकाकी पाडण्याचा प्रयत्न तर होणारच पण 150 जागांवर दावा केला जात असल्याने शिवसेनेच्या अडचणी वाढवण्याचा भाजपाचा प्रयत्न राहणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.