BMC Election : मुंबई महापालिका निवडणूक लांबणीवर?

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारने मुंबईतील प्रभागांची संख्या २३८ वर
BMC Election Postpone number of wards Mumbai Municipal Corporation to 227 was transferred Supreme Court Bombay High Court
BMC Election Postpone number of wards Mumbai Municipal Corporation to 227 was transferred Supreme Court Bombay High Court sakal
Updated on

मुंबई : मुंबई महापालिकेतील प्रभागांची संख्या पुन्हा २२७ वर आणण्याच्या निर्णयाला विरोध करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाकडून मुंबई उच्च न्यायालयाकडे वर्ग करण्यात आली आहे. त्यामुळे या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारने मुंबईतील प्रभागांची संख्या २३८ वर नेली होती. ती सत्तांतरानंतर शिंदे-फडणवीस सरकारने पुन्हा २२७ वर आणली.

त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. प्रभागसंख्या कमी करण्याचा हा निर्णय विधिमंडळाच्या कार्यकक्षेत येतो, असे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले. या निर्णयाला आव्हान द्यायचे असेल, तर ते मुंबई उच्च न्यायालयात द्या, असेही सांगण्यात आले आहे. यासंबंधीची याचिका पुन्हा उच्च न्यायालयाकडे आल्यास, त्यासंदर्भातील बाजू ऐकणे, आक्षेप नोंदवणे अशी सर्व प्रक्रिया होईल. त्यामुळे पुन्हा एकदा निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.