विधान परिषद निवडणूक : मलिक- देशमुख मतदान करू शकतील का? उद्या निर्णय
मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीत मतदान करता यावं अशी मागणी करणाऱ्या राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. महाराष्ट्रात विधान परिषद निवडणुकीसाठी 20 जून रोजी मतदान होणार आहे. न्यायमूर्ती एन.जे. जमादार यांनी गुरुवारी सर्व बाजूंचा युक्तिवाद ऐकून उद्यासाठी निकाल राखून ठेवला आहे, त्यामुळे उद्या या प्रकरणाचा निकाल लागण्याची शक्यता आहे. (bombay hc on pleas of nawab malik anil deshmukh seeking nod to vote in maha mlc polls)
मलिकांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी यावेळी सांगितले की, हे प्रकरण न्यायालयाच्या कोठडीत असताना मत देण्यासाठी एस्कॉर्टमध्ये जाण्याच्या साध्या विनंतीशी संबंधित आहे. नवाब मलिक हे सध्या रुग्णालयात आहेत आणि तुरुंगात बंदिस्त नाहीत. तसेच त्यांना अद्याप दोषी ठरवण्यात आलेले नाही, त्यामुळे त्यांना मतदान प्रक्रियेतून अपात्र ठरवण्यात आलेले नाही, असे देसाई म्हणाले.
सध्याच्या खटल्यात आवश्यक ती परवानगी देण्याचा अधिकार न्यायालयाला आहे, असा युक्तिवादही त्यांनी केला. देसाई यांनी विचारले की, लोकशाहीत एखाद्या खटल्यातील व्यक्तीला (जो निर्दोष असण्याची शक्यता आहे, ज्याच्याविरुद्ध कोर्टातही केस सुरू झालेली नाही) त्याला मतदानाचा अधिकार नाकारला गेला? किंवा त्याला लोकशाही प्रक्रियेपासून दूर ठेवण्यात आले आहे?
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक हे महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री आहेत. त्यांना 23 फेब्रुवारी 2022 रोजी अंमलबजावणी संचालनालयाने मनी लाँड्रिंग प्रकरणी अटक केली होती आणि सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. न्यायालयाने यापूर्वीच त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
याआधी विशेष पीएमएलए कोर्टाने अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांची राज्यसभेसाठी मतदान करण्याची याचिका फेटाळून लावली होती. ज्याला त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले पण उच्च न्यायालयाने याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला.
महाराष्ट्रात 20 जून रोजी होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीपूर्वी, मलिक यांना बडतर्फ करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्याने मलिक यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ईडीने अटक केल्यानंतरही नवाब मलिक आपल्या पदावर कायम असल्याचे या याचिकेत म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.