मुंबई : नवाब मलिक (Nawab Malik) हे आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांनी राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्याची परवानगी मिळावी, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आता मलिक यांनी विधान परिषद निवडणुकीत (Legislative Council Election 2022) मतदान करता यावे, या करिता न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. त्यावर न्यायालयाने नवीन याचिका दाखल करण्यास सांगितले आहे. मलिक यांच्या अगोदरच्या याचिकेत दुरुस्ती करण्याची मुभा देऊन विधान परिषद निवडणुकीत मतदान करण्याची परवानगी देण्याबाबत सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. (Bombay High Court Says To Malik, File New Petition For Voting In Legislative Council Election)
ती राज्यसभा निवडणूक होती. त्यात पीएमएलए न्यायालयाच्या आदेशाविरोधात तुम्ही याचिका दाखल केली होती. ती निवडणूक झाली असून अगोदरची याचिका निरर्थक झाली आहे. त्यामुळे सदरील याचिका मान्य होऊ शकत नाही. ती मागे घेऊन नव्याने याचिका करा, अशी सूचना न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांनी मलिक यांच्या वकिलांना केल्या आहेत.
आता नवाब मलिकांना परवानगी मिळते की नाही? हे पाहावे लागेल. दुसरीकडे न्यायालयीन कोठडीत असलेल्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही विधान परिषद निवडणुकीत मतदान करण्याची परवानगीसाठी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर १५ जून रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.