Video: 'मायभूमी'त मिळतीये नाश्त्यासह वाचनाची मेजवानी

साताऱ्यातील मायभूमी स्नॅक्स सेंटर नाश्त्यासोबत पुस्तकंही वाचायला मिळतात.
Maybhumi Snacks Centre
Maybhumi Snacks CentreSatara
Updated on

आपण आपल्या सभोवताली अनेक हॉटेल्स पाहतो. प्रत्येक हॉटेलचं स्वतःचं एक वैशिष्ट्य असते. काही हॉटेल पदार्थांच्या चवीसाठी प्रसिद्ध असतात तर काही त्यांच्या सौंदर्यासाठी, पण साताऱ्यातील मायभूमी स्नॅक्स सेंटर हे छोटंस हॉटेल एका खास कारणासाठी चर्चेत आहे. या हॉटेलमध्ये एक अशी गोष्ट आहे, जी आपल्याला एखाद्या मोठ्या हॉटेलमध्येही पाहायला मिळत नाही. ही खास गोष्ट म्हणजे या हॉटेलची खास लायब्ररी. या हॉटेलच्या मालक सौ. वैशाली दोरके यांनी आपल्या छोट्याशा स्नॅक्स सेंटरमध्ये छोटंसं ग्रंथालय सुरु केलं आहे. सातारा-लोणंद रोडवरील वाठार स्टेशननजीकच्या तळीये फाट्यावरील या पुस्तकांच्या हॉटेलचं कौतुक होत आहे. (Books are available along with breakfast at Mayabhumi Snacks Center in Satara.)

Maybhumi Snacks Centre
भीवसुळा: अंगावर काटा आणणाऱ्या नैसर्गिक गुहांचा भुलभुलैय्या

अलीकडच्या काळात स्मार्टफोनमुळे लोकांचं वाचन खूप कमी झालंय. सकाळी उठल्यापासून ते अगदी झोपेपर्यंत लोक मोबाईलला चिकटून असतात. त्यामुळे लोकांना पुस्तकं वाचायलाच सवडच मिळत नाही. तसं पाहिलं तर इंटरनेटवर उपयुक्त माहितीचा खजिना उपलब्ध आहे. परंतु लोकांना ते वाचायला फारसं आवडत नाही. हेच लक्षात घेऊन वैशाली दोरके यांनी नुकत्याच सुरु केलेल्या मायभूमी स्नॅक्स सेंटरमध्ये छोटीशी लायब्ररी सुरु केली आहे.

स्वादिष्ट पदार्थांची चव चाखत पुस्तकांचीही मेजवानी या हॉटेलमध्ये लोकांना मिळत आहे. लोकांनी यावं, पुस्तकं वाचावीत या उद्देशाने त्यांनी ही छोटेखानी लायब्ररी सुरु केली आहे. त्यात त्यांनी महात्मा गांधी ते अब्राहम लिंकन यांच्या आत्मवृत्तापासून ते अनेक शास्त्रज्ञांची माहिती देणारी पुस्तके तसेच लहान मुलांसाठी गोष्टींची पुस्तकेही आहेत.

Maybhumi Snacks Centre
Tourism: प्री वेडींग अन् पर्यटनासाठी सातारा आहे खास; जाणून घ्या

या उपक्रमाबद्दल विचारलं वैशाली यांना विचारलं असता ही कल्पना माझी नसून एकदा टिव्हीवर त्यांनी एका व्यक्तीने अशी संकल्पना राबवल्याचं पाहिले होते, असं प्रांजळपणे कबूल करतात. आपण जेव्हा आपला स्वतःचा व्यवसाय सुरु करू तेव्हा ही संकल्पना राबवण्याचं त्यांनी ठरवलं होतं. शेवटी मायभूमी स्नॅक्स सेंटर या छोट्याशा हॉटेलमध्ये त्यांनी ही लायब्ररी सुरु केलीये. येथे येणाऱ्या ग्राहकांनी किमान ऑर्डर येईन काही पानं वाचली तरी माझी लायब्ररी सार्थकी लागेल, असं त्या म्हणतात. किती वाचतो यापेक्षा वाचणं महत्त्वाचं आहे, असं त्या सांगतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.