Mumbai Heavy Rain:मुंबईची तुंबई व्हायला सुरुवात? मुंबई उपनगरात मुसळधार पाऊस, बोरिवली स्थानक परिसर जलमय

Mumbai Red Alert: मुंबईमध्ये होणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलंय. काही ठिकाणी रेल्वे ट्रॅक देखील पाण्याखाली गेले आहेत.
borivali station
borivali stationEsakal
Updated on

Mumbai Monsoon:भारतीय हवामान खात्याने आज मुंबईत पावसाचा रेड अलर्ट जाहीर केला होता तो कुठेतरी खरा होताना पाहायला मिळत आहे. आज सकाळपासूनच मुसळधार पावसाने मुंबई आणि मुंबई उपनगराला झोडपले असून उपनगरातील अनेक सखल भागात पाणी साचलं आहे.

मुंबई उपनगरातील बोरिवली रेल्वे स्थानकाचा पूर्वेकडील परिसर जलमय झाला असून, साधारणपणे अडीच ते तीन फुटापर्यंत पाणी या परिसरात साचल्याचं पाहायला मिळत आहे. साचलेल्या पाण्यात रस्त्यावरील मुले पोहण्याचा आनंद देखील घेताना पाहायला मिळत आहे.

मात्र, दुसरीकडे पाण्यातून दुचाकी स्वार आणि रिक्षा चालकांना वाहने चालवताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे देखील चित्र या परिसरात पाहायला मिळत आहे.

बुधवारी (दि.२६ जुलै) हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला होता. या धर्तीवर मुंबई आणि उपनगरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या होत्या. स्थानिक प्रशासनाकडूनही वेळोवेळी नागकरिकांसाठी सुचना देण्यात येत आहेत. मुंबईतील महत्वाच्या ठिकाणी पाणी साचतं असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

गुरवारी (दि.२७ जुलै) दादर स्थानकावर प्रवाशांचा खोळंबा झाला. परिसरामध्ये ३ फूटांपर्यंत पाणी साचल्याने वाहतूक बंद करण्यात आली होती. तर ठाण्यातही पावसाचा जोर वाढलाय आणि अनेक ठिकाणी पाणी साचलंय. कल्याणमध्येही जोरदार पावसामुळे रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेला आहे.

borivali station
Monsoon Update : 'या' जिल्ह्यात सर्व धबधब्यांवर पर्यटकांना जाण्यास बंदी; जिल्हाधिकाऱ्यांनी काढला महत्वाचा आदेश

मुंबईबरोबर महाराष्ट्राच्या दुसऱ्या भागांमध्येही पावसाचा जोर वाढत आहे. बऱ्याच ठिकाणी पूरसदृष्य परिस्थिती निर्माण होत असून, काही भागातील जनजीवर विस्कळीत झालंय. अशात विधानसभेचं पावसाळी अधिवेशन मुंबईत सुरु आहे.

यावेळी भाजपचे आमदार संजय कुटे यांनी अधिवेशन १५ दिवसांनी घेण्याचा विचार दर्शवला होता. ते म्हणाले की, लोकांना आमदार त्यांच्या मतदार संघात हवे आहेत.

borivali station
Monsoon Session : अधिवेशन संपत आलं तरी विरोधीपक्षनेता ठरेना! काँग्रेसकडून आज घेतला जाणार निर्णय?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.