महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे 5 दिवसीय विदर्भ दौऱ्यावर आहेत. सकाळी विदर्भ एक्सप्रेसने ते नागपुरमध्ये दाखल झाले. यावेळी मनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांचे ढोल-ताशाच्या गजरात आणि घोषणा देवून जंगी स्वागत केले. दरम्यान, राज ठाकरेच्या दौऱ्यात एका ६ वर्षाच्या चिमुकल्याची चर्चा अधिक रंगली आहे. राज ठाकरेंना भेटण्यासाठी लहानग्याने उपाशी राहण्याचा हट्ट धरला होता. त्याचा हा हट्ट पाहून तु खाईपर्यंत मी भेटणार नाही अशी अट राज ठाकरेंनी घातली. (Boy insists on starving to meet Raj Thackeray vidarbha )
या चिमुकल्याचे नाव अद्वैत पत्की असे आहे. राज ठाकरे यांचा चाहतावर्ग अबालवृद्धांपर्यंत असल्याचे सांगितले जाते. याचाच काहीसा प्रत्यय आज नागपुरमध्ये आला. आपल्या लहान नातवाचा ठाकरेंच्या सहीचा हट्ट पुरविण्यासाठी थेट ते मुक्कामी असलेल्या हॉटेलमध्ये एक आजी आणि संबंधित नातू पोहोचले. त्यावेळी ठाकरेंच्या सुरक्षा रक्षकांनी देखील आजी आणि नातवाला भेटीचे आश्वासन दिले.
मात्र, अद्वैतने राज ठाकरे यांची भेट होईपर्यंत नाष्टा देखील करणार नाही असा अट्टाहास धरला. चिमुकल्याचा निरोप ऐकून राज यांनी देखील त्याच्यासमोर एक अट ठेवली. तु खाईपर्यंत मी भेटणार नाही. असं राज ठाकरेंनी त्याला सांगितलं. त्यानंतर अद्वैतने नाष्टा केला असल्याची माहिती त्याच्या आजीने दिली.
त्यानंतर राज ठाकरेंनी त्याची भेट घेतली. यावेळी अद्वैतने एका डायरीवर राज ठाकरेंसाठी एक खास संदेश देखील लिहून आणला होता. त्यावर त्यांची ऑटोग्राफदेखील त्याने घेतली. त्याचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होताना दिसत आहे.
आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षबांधणी आणि पक्षविस्तार यासाठी राज ठाकरे सध्या मैदानात उतरले आहेत. यासाठी ते विदर्भ दौऱ्यावर आले असल्याचे पाहायला मिळते. या दौऱ्यात ते पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चा केली असल्याचे सांगण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.