परमनंट भरतीला ब्रेक! 10 पेक्षा कमी पटाच्या शाळांवर प्रत्येकी 1 कंत्राटी शिक्षक; सुधारित निर्णयात निवृत्त शिक्षक वगळले; सुशिक्षित बेरोजगार डीएड-बीएडधारकांची नियुक्ती

कमी पटाच्या शाळांमधील दोनपैकी एका नियमित शिक्षकाची नेमणूक दुसऱ्या शाळांमध्ये करण्यात आली आहे. त्याठिकाणी आता कंत्राटी शिक्षक नेमले जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदांच्या शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरतीला ब्रेक लागणार आहे.
schools
schoolssakal
Updated on

सोलापूर : दहापेक्षा कमी पटसंख्येच्या जिल्हा परिषदांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये आता सुशिक्षित बेरोजगार डीएड-बीएडधारकांची नेमणूक होणार आहे. त्यांना दरमहा १५ हजार रुपयांचे मानधन दिले जाणार आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या ७२ शाळांमध्ये कंत्राटी शिक्षक नेमणुकीची प्रक्रिया सुरु झाली आहे. तत्पूर्वी, कमी पटाच्या शाळांमधील दोनपैकी एका नियमित शिक्षकाची नेमणूक दुसऱ्या शाळांमध्ये करण्यात आली आहे. त्याठिकाणी आता कंत्राटी शिक्षक नेमले जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदांच्या शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरतीला ब्रेक लागणार आहे.

इंग्रजी माध्यमांच्या शाळांशी स्पर्धा करताना जिल्हा परिषदांच्या शाळांची पटसंख्या कमी होत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदांच्या अनेक शाळांमध्ये सेमी इंग्रजीचे वर्ग सुरु करण्यात येत आहेत. पण, स्वतंत्र विषयांचे शिक्षक विशेषत: इंग्रजी व विज्ञानाचे शिक्षक कमीच आहेत. तरीदेखील सहा ते सात वर्षानंतर यंदा जिल्हा परिषदांच्या शाळांमधील ३० हजार शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आणि त्यातील २० हजार पदे भरली गेली. मात्र, उर्वरित पदांसह अन्य रिक्त पदांची भरती आता कंत्राटी शिक्षक भरतीमुळे थांबली आहे. राज्यातील जिल्हा परिषदांच्या कमी पटसंख्येच्या शाळांवर पाच हजार कंत्राटी शिक्षक नेमले जाणार असून तेथील पूर्वीचे पाच हजार शिक्षक दुसऱ्या शाळांमध्ये पाठविण्यात आले आहेत.

कमी पटाच्या शाळांवर प्रत्येकी एक कंत्राटी शिक्षक

राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार आता १० किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांवर बीएड, डीएडधारक सुशिक्षित तरुण-तरुणींना कंत्राटी तत्त्वावर नेमणूक दिली जाणार आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या ७२ शाळांची पटसंख्या दहापेक्षा कमी आहे.

- कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर

कमी पटाच्या शाळांवरील शिक्षक दुसऱ्या शाळांमध्ये

राज्यातील जिल्हा परिषदांच्या १४ हजार ७८३ शाळांची पटसंख्या २०पेक्षा कमी आहे. सुरवातीला या सर्व शाळांमध्ये प्रत्येकी एक शिक्षक कंत्राटी (सेवानिवृत्त किंवा डीएड-बीएडधारक तरुण) नेमण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला होता. मात्र, त्याला विरोध झाल्यानंतर त्या निर्णयात बदल करून आता केवळ बीएड-डीएडधारक सुशिक्षित तरुण-तरुणींनाच घेण्याचे निश्चित झाले आहे. या पार्श्वभूमीवर कमी पटाच्या शाळांवरील दोनपैकी एका नियमित शिक्षकाची नेमणूक दुसऱ्या शाळांमध्ये करण्यात आली आहे. त्यामुळे बहुतेक शाळांना पटसंख्येच्या प्रमाणात शिक्षक उपलब्ध झाल्याचे चित्र आहे.

सोलापूर जिल्हा परिषदांच्या शाळा

  • एकूण शाळा

  • २,७८८

  • शिक्षकांची अंदाजे रिक्तपदे

  • ७००

  • २०पेक्षा कमी पटाच्या शाळा

  • २४९

  • १०पेक्षा कमी पटाच्या शाळा

  • ७२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.