Latest Marathi News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Breaking Marathi News live Updates 19 September 2024 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Latest Maharashtra News live Updates
Latest Maharashtra News live Updates esakal
Updated on

cm shinde live: लाडकी बहीण योजनेसाठी गडबड करु नका- मुख्यमंत्री

''मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी खात्याचे केवायसी करण्यासाठी माझ्या बहिणी रात्रीपासून बँकेपुढे रांग लावत असल्याचे वृत्त बघितले. माझ्या बहिणींना मी पुन्हा सांगतोय, निष्कारण घाई गडबड करून त्रास करून घेऊ नका. सर्व पात्र भगिनींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तुमचा हा भाऊ या योजनेवर व्यक्तिशः देखरेख करतोय. काळजी करू नका.'' असं ट्वीट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

Live Updates: राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांना १० हजार पेन्शन जाहीर

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांना १० हजार पेन्शन जाहीर करण्यात आली आहे. याचा फायदा ५०० कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. ही आजीवन पेन्शन मिळणार आहे.

Shivsena Live: शिवसेना-राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी 22 ऑक्टोबरला सुनावणी?

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी सुप्रीम कोर्टात २२ ऑक्टोबर रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. कारण सुप्रीम कोर्टाच्या कॉम्पुटर जनरेटेड तारखेमध्ये सुनावणीची तारीख थेट महिन्याभरानं देण्यात आली आहे. शनिवारी येणाऱ्या कामकाजाच्या नव्या लिस्टमध्ये सुनावणी कधी होणार हे स्पष्ट होणार आहे. मागच्या २ आठवड्यापासून हे प्रकरण सुनावणीसाठी बोर्डावर आलेलंच नाही. कोर्ट पुढील आठवड्यात सुनावणी घेतंय का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कोर्टानं पुढील आठवड्यात सुनावणीची तारीख दिली तर विधानसभेच्या आधी निकाल लागतो का? हे पाहणं महत्वाचं आहे.

शिवसेना ठाकरे अन् राष्ट्रवादी शरद पवार पक्षांमध्ये बैठक संपन्न 

शिवसेना ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांमध्ये बैठक पार पडली. जागा वाटप संदर्भात या दोन पक्षांमध्ये बैठक पार पडली. महाराष्ट्रातील 15 ते 20 जागा आशा आहेत ज्यामध्ये दोन्ही पक्ष आग्रही आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ज्या जागा एकमेकांच्या विरोधात लढले होते अशा काही जागांवर तिढा आहे. यामध्ये 15 ते 20 जागांवर दोन्ही पक्षांनी दावा केला आहे. यावर सविस्तर चर्चा होऊन, दोन पक्षांचा दावा असलेल्या जागांवरील तिढा सोडवला जाईल, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

Salman Khan Father News Live : अभिनेता सलमान खानच्या वडिलांना धमकावल्याप्रकरणी दोघे ताब्यात

मुंबई: अभिनेता सलमान खानचे वडील दिग्गज लेखक सलीम खान यांना धमकावल्याबद्दल दोन जणांच्या ताब्यात घेण्यात आले आहे. राज टिळक रौशन, डीसीपी झोन ​​IX, यांनी याबद्दल माहिती दिली आहे.

Assembly Election Live : राज्यात परिवर्तन महाशक्ती नावाने तिसरी आघाडी

आज पुण्यात झालेल्या बैठकीत राजू शेट्टी, बच्चू कडू, संभाजीराजे आणि रविकांत तुपकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत परिवर्तन महाशक्ती नावाने तिसरी आघाडी उघडण्यात आली आहे. २६ सप्टेंबर रोजी संभाजीनगर येथे या तिसऱ्या आघाडीचा महामेळावा होणार आहे. आज पुणे येथे झालेल्या बैठकीत याबद्दलची घोषणा करण्यात आली आहे.

Assembly Election Live : शिवसेना UBT अन् शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची महत्वाची बैठक सुरू

शिवसेना UBT आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांची विधानसभा जागावाटप संदर्भात बीकेसी येथील सॅाफीटेल हॅाटेलमध्ये बैठकीला सुरुवात झाली आहे. ठाकरे गटाकडून संजय राऊत, अनिल देसाई तर पवार गटाकडून जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड बैठकीसाठी उपस्थित आहेत

Nandurbar Live : नंदूरबार येथे माळीवाडा परिसरात दोन गटात तुफान दगडफेक 

नंदूरबार शहरातील माळीवाडा परिसरात दोन गटात राडा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत दोन्ही गटांनी एकमेकांवर तुफान दगडफेक केली, तसेच वहानांना आगी देखील लावण्यात आल्या. यामध्ये दोन पोलिस कर्मचारी देखील जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. या प्रकारामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Congress Agitation In Mumbai Live : भाजप नेते अनिल बोंडे यांच्याविरोधात मुंबईत काँग्रेसचे आंदोलन

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याबद्दल भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी केलेल्या विधाननंतप काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. यादरम्यान काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी राहुल नार्वेकर यांच्या निवासस्थानाबाहेर देखील काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आंदोलन केले.

Pitru Paksha Live : पितृपक्षात भाजीपाल्याची मागणी वाढली, दरातही वाढ 

बुधवार (दि. १८) पितृपक्ष सुरू झाला असल्यामुळे भाजीपाल्यांच्या मागणीत वाढ झाली असून दरांमध्येही वाढ झालेली दिसून येत आहे. दरम्यान, पावसामुळे पालेभाज्या खराब होऊन उत्पादनात कमालीची घट झालीये. त्यामुळे आवक घटली असताना आठवडे बाजारात तरकारी मालासह भाजीपाल्याचा भाव चांगलाच वाढल्याचे दिसून येत आहे.गणेशोत्सव संपताच पितृपक्षाला सुरुवात झाली. पितृपक्षात पितरांना भोजन घालण्याची परंपरा आहे. यासाठी प्रथा परंपरेने विविध प्रकारच्या भाज्यांना मागणी असते.

Rahul Gandhi Live : भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांकडून राहुल गांधी विरोधात केलेल्या वक्तव्या विरोधात आंदोलन

  • भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांकडून राहुल गांधी विरोधात केलेल्या वक्तव्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी सीताबर्डी पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली.

  • पोलीस स्टेशनला तक्रार देऊन पण पण गुन्हा दाखल झालेला नाही. म्हणून काँग्रेसचे नेते पोलीस स्टेशनमध्ये आक्रमक झाले.

  • अनिल बोंडे यांच्यावर 5 वाजेपर्यंत गुन्हा दाखल झाला नाही, तर आम्ही बोनडेच्या तोंडाला काळ फासू.. असा इशारा काँग्रेसच्या पदाधिकारी यांनी दिला.

  • पोलीस स्टेशनमध्येच काँग्रेसच्या वतीने निवेदन देताना घोषणा देण्यात आल्यात.

Sanjay Gaikwad Live : आमदार संजय गायकवाड यांच्यावर कारवाई करा, काँग्रेस पदाधिकाऱ्यांची मागणी

शिवाजीनगर : काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणारे आमदार संजय गायकवाड यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. अशी मागणी कॅाग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी चतुश्रुंगी पोलीस ठाणे येथे निवेदन देऊन केली आहे. यावेळी राहुल वंजारी, गणेश गुगळे, राजश्री अडसूळ, प्रियांका मधाले, पौर्णिमा भगत, विद्या डोंगरे, गणेश साळुंके, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Teachers Strike Live : २५ सप्टेंबर रोजी शिक्षकांचे सामूहिक रजा आंदोलन   

वाई शहर : १५ मार्च, २०२४ चा संचमान्यता आदेश रद्द करावा , २०पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांवर कंत्राटी शिक्षक नेमणे , या व अन्य मागण्यांविरुद्ध असंतोष व्यक्त करण्यासाठी वाई तालुक्यातील सर्व शिक्षक संघटना २५ सप्टेंबर रोजी सामुहिक रजा आंदोलन करणार आहेत, अशी माहिती प्राथमिक शिक्षक समन्वय समितीने पत्रकाद्वारे दिली.

IPS Shivdeep Lande Resign Live : बिहार केडरमधील IPS शिवदीप लांडे यांचा राजीनामा 

महाराष्ट्रातील रहिवाशी असलेले बिहार केडरमधील IPS शिवदीप लांडे यांनी पोलीस सेवेचा राजीनामा दिला आहे. पोलिस दलात त्यांची बिहारमधील सिंघम म्हणून ओळख होती. सोशल मीडियावर शिवदीप लांडे यांनी स्वत: राजीनामा दिल्याची माहिती दिली आहे. 

Bombay High Court Kangana Ranaut Emergency Live Updates: 'इमरजन्सी'च्या प्रदर्षनाबाबत आठवड्याभरात निर्णय घेण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे सीबीएफसीला निर्देश

  • कंगना राणावतचा चित्रपट 'इमरजन्सी'च्या प्रदर्षनाबाबत आठवड्याभरात निर्णय घेण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे सीबीएफसीला निर्देश

  • सेन्सॉर बोर्डानं 'हो' किंवा 'नाही' ते ठरवायलाच हवं उच्च न्यायालयाने केलं स्पष्ट

  • प्रदर्शनाची परवानगी देणार नसल्यास पुढील सुनावणीत कारणांसह स्पष्टीकरण सादर करण्याचेही निर्देश

  • २५ सप्टेंबरला होणार पुढील सुनावणी

  • सिनेमामुळे कायदा सुव्यस्थेची परिस्थिती निर्माण होत असेल तर ती प्रशासनानं हाताळावी, सीबीएफसीला त्याची चिंता करण्याचं कारण नाही - उच्च न्यायालय

  • मध्यप्रदेश हायकोर्टानं 'इमरजन्सी' सिनेमाला दिलेलं सर्टिफिकेट रद्द करणं चुकीचं - मुंबई उच्च न्यायालय

  • याचिकाकर्ते याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाद का मागत नाहीत?, हायकोर्टाचा सवाल

  • सिनेमात धार्मिक भावना भडवणारी दृश्य आणि संवाद असल्यानं प्रदर्शनाबाबत समितीचा विचारविनिमय अद्यापही सुरूच असल्याचा सेन्सॉर बोर्डाचा दावा

  • झी एन्टरटेन्मेंट स्टुडिओनं दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती बर्गिस कोलाबावाला आणि न्यायमूर्ती फिरदोश पुनीवाला यांच्या खंडपीठापुढे सुरू आहे सुनावणी

One Nation one Election Live Updates: वन नेशन वन इलेक्शन म्हणजे निवडणुका संपवण्याचा प्रयत्न - आरजेडी नेते तेजस्वी यादव

वन नेशन वन इलेक्शनवर आरजेडी नेते तेजस्वी यादव म्हणाले, "हे असंवैधानिक काम केले जात आहे. लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे... भाजप आल्यास लोकांचे अधिकार नष्ट होतील, हे सिद्ध झाले आहे. हे मतदानाचा हक्क काढून घेईल, लोकशाही नष्ट करतील... हळूहळू निवडणुका संपवण्याचा हा प्रयत्न आहे..."

सरकारचे निर्णय अधिक वेगाने घेतले जातील - लोढा

हा एक अतिशय चांगला उपक्रम आहे. प्रत्येकाने याला पाठिंबा दिला पाहिजे कारण तो देशाच्या हिताचा आहे. यामुळे लोकांचा वेळ वाचेल, सरकारी पैशांची बचत होईल आणि त्याच वेळी, सरकारचे निर्णय अधिक वेगाने घेतले जातील," असे महाराष्ट्राचे मंत्री मंगल यांनी सांगितले.

एकाच वेळी सर्व निवडणुका घेतल्या तर त्याचा फायदा होईल - केसरकर

हा एक अतिशय चांगला निर्णय आहे. निवडणुका झाल्या की आदर्श आचारसंहिता लागू होते आणि संपूर्ण सरकारी यंत्रणा त्यात गुंतते, त्यामुळे विकास कामे मागे पडतात. एकाच वेळी सर्व निवडणुका घेतल्या तर त्याचा फायदा होईल. सरकार आहे, आणि आदर्श आचारसंहितेमुळे विकासकामांमध्ये कोणतेही अडथळे येणार नाहीत,' असे महाराष्ट्राचे मंत्री दीपक केसरकर यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या 'एक राष्ट्र, एक निवडणूक' प्रस्तावाला मंजुरी दिल्यावर सांगितले.

रावसाहेब दानवेंच्या विरोधात सत्तारांच्या समर्थकांचा मोर्चा

रावसाहेब दानवेंच्या विरोधात सत्तारांच्या समर्थकांनी मोर्चा काढला आहे.

वन नेशन वन इलेक्शन आणून अमेरिका सारखी पद्धत आणण्याचा हा प्रयत्न - जयंत पाटील

आपला देश हा संघराज्य आहे… वन नेशन वन इलेक्शन आणून अमेरिका सारखी पद्धत आणण्याचा हा प्रयत्न आहे, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.

bharat gogawale live: भरत गोगावले यांची एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्तीची शक्यता

शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांची एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती महत्त्वाची ठरू शकते. मात्र, गोगावले हे हे पद स्वीकारतील का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. काही दिवसांपूर्वीच शिवसेनेतील इतर नेत्यांना महामंडळाची पदे देण्यात आली होती, त्यामुळे आता अजित पवार गटात नाराजी पसरली असल्याचे सांगितले जात आहे.

Waqf Bill live: वक्फ विधेयकावरील संयुक्त संसदीय समिती पाच राज्यांचा दौरा करणार

वक्फ विधेयकावरील संयुक्त संसदीय समिती पाच राज्यांचा दौरा करणार आहे. यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटकचा समावेश आहे. ही समिती मुंबई, अहमदाबाद, हैदराबाद, चेन्नई, बंगळुरूमध्ये बैठका घेणार असून हा दौरा 26 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत होईल. जेपीसी सदस्य पाच राज्यांतील अल्पसंख्याक विभागांच्या प्रतिनिधींची भेट घेणार आहेत आणि वक्फ मालमत्तांची माहिती गोळा करून वक्फ विधेयकाबाबत चर्चा करणार.

Ajit Pawar Live: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार करणार महाराष्ट्र दौरा

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार महाराष्ट्र दौरा करणार आहेत. येत्या २१ तारखेपासून राज्यव्यापी दौऱ्याला सुरुवात होण्याची शक्यता आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा अजित पवार आढावा घेणार आहेत. अजित पवारांनी विधानसभानिहाय आमदारांशी चर्चा केली आहे.

Mumbai Andheri Fire Live: अंधेरी पश्चिम लोखंडवाला परिसरात भीषण आग

लोखंडवाला सेकंड क्रॉस लेन येथील दोन बंगल्यांना सकाळी साडेनऊच्या सुमारास भीषण आग लागली आहे. बंगल्याच्या तळमजल्यावर आग लागल्याने बंगल्याचे मोठे नुकसान झाले आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. आग नेमकी कशाने लागली हे अद्याप स्पष्ट नाही. अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर आता नियंत्रण मिळवण्यात यश आले असून सध्या कुलिंग चे काम सुरू आहे

Pune University Road Live: पुणे विद्यापीठ चौकात प्रचंड वाहतूक कोंडी 

पुणे विद्यापीठ चौकात मेट्रोचे मोठ्या प्रमाणात काम सुरु असल्याने नागरिकांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या कामामुळे चौकातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले असून, वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मात्र तरी देखील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटत नाही आहे

JP Nadda Letter Live: जेपी नड्डा यांचं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या पत्राला उत्तर

भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या पत्राला उत्तर दिलं आहे. तुमचे अयशस्वी उत्पादन जनतेने वारंवार नाकारले आहे आणि पुन्हा राजकीय मजबुरीमुळे ते बाजारात आणण्याच्या प्रयत्नात तुम्ही पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं. पत्र वाचल्यानंतर मला असं दिसत की तुम्ही वास्तवापासून दूर आहात.

तुम्हाला राहुल गांधींसह तुमच्या नेत्यांच्या गैरकृत्यांचा विसर पडला आहे किंवा तुम्ही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल आहे असं दिसतय. देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष आता आपल्या प्रसिद्ध राजपुत्राच्या दबावाखाली 'कॉपी पेस्ट' पक्ष बनला आहे. जे पी नड्डा यांनी राहुल गांधी यांच्यावर पत्रातून टीका केलीये.

Pune Visarjan Live: पुण्यातील विसर्जन मिरवणुकी दरम्यान तिघांचा आकस्मिक मृत्यू

पुण्यातील विसर्जन मिरवणुकी दरम्यान तिघांचा आकस्मिक मृत्यू झाला आहे. मृत्यू नेमक्या कशामुळे झाला हे शवविच्छेदन अहवालातून समोर येईल. ससून रुग्णालयाने ही माहिती दिली आहे. नयन ढोके, विशाल बल्लाळ, व अन्य एक 45 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. लक्ष्मी रोड, टिळक रोड व एकाचा कसबा गणपती मंडळाजवळ मृत्यू झालाय. तिघांचेही मृतदेहांचे ससून रुग्णालयामध्ये शवविच्छेदन केले असून काही काळामध्ये अहवाल येणार आहे.

CM Eknath Shinde LIVE : स्वच्छता मोहिमेत मुख्यमंत्री शिंदे झाले सहभागी, गिरगाव चौपाटीवर केली स्वच्छता

'स्वच्छता ही सेवा' कार्यक्रमाचा एक भाग म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईतील गिरगाव चौपाटी येथे स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले आहेत.

Kolhapur Crime : विहिरीत पाय घसरून पडल्याने सोनाळीत शेतकऱ्याचा मृत्यू

कोल्हापूर : सोनाळी (ता. करवीर) येथे विहिरीत पाय घसरून पडल्याने रामचंद्र विठोबा मोरे (वय ५५) यांचा मृत्यू झाला. घटना पाहणाऱ्या नातेवाइकांनी त्यांना पाण्याबाहेर काढून बेशुद्धावस्थेत सीपीआरमध्ये दाखल केले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत करण्यात आली.

CM Eknath Shinde LIVE : 'स्वच्छता ही सेवा' मोहिमेत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे पोहोचले गिरगाव चौपाटीवर

'स्वच्छता ही सेवा' मोहिमेत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईतील गिरगाव चौपाटीवर पोहोचले आहेत.

Nipah Virus Kerala : 'निपाह' विषाणूमुळे केरळात एकाचा मृत्यू

बंगळूर : निपाह विषाणूमुळे बंगळूरच्या एका विद्यार्थ्याचा केरळमध्ये मृत्यू झाला आहे. यानंतर कर्नाटक आरोग्य विभागाने सर्व रुग्णालयांना सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. पायाला दुखापत झाल्यामुळे संबंधित विद्यार्थी २५ ऑगस्ट रोजी त्याच्या गावी परतला होता. पाच सप्टेंबरपासून त्यांना ताप येऊ लागला आणि त्याला स्थानिक दवाखान्यात दाखल केले. त्यानंतर आठ सप्टेंबरला त्याचे निधन झाले. त्याच्या रक्ताची चाचणी केल्यानंतर त्याला ‘निपाह’ची लागण झाली होती, असे स्पष्ट झाले होते.

Bihar News : कृष्णानगरमध्ये 20 ते 25 घरांना हल्लेखोरांनी लावली आग

नवादा, बिहार : मुफसिल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कृष्णानगरमध्ये सुमारे 20-25 घरांना काही हल्लेखोरांनी आग लावलीये. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Railway Track LIVE : उत्तर प्रदेश-बिहारमध्ये मालगाडीचे डबे रेल्वे रुळावरून घसरले

नवी दिल्ली : उत्तर भारतात रेल्वे मालगाडीला दोन ठिकाणी अपघात झाला आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये मालगाडीचे डबे रेल्वे रुळावरून घसरले आहेत. मथुरामध्ये तब्बल 25 डब्बे रेल्वे रुळावरून घसरले, तर बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये मालगाडीचे चार डबे घसरले आहेत. दोन्ही घटनांमध्ये सुदैवाने जीवितहानी झालेली नाही.

PM Narendra Modi LIVE : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज श्रीनगर दौऱ्यावर

जम्मू-काश्मीरमध्ये वेगाने होत असलेल्या विकासामुळे लोकांच्या जीवनात समृद्धीचा संदेश देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज श्रीनगरमध्ये मेगा रॅलीला संबोधित करण्यासाठी येत आहेत. पंतप्रधानांची श्रीनगर रॅली भाजपसाठी खूप महत्त्वाची आहे.

Government Engineering College LIVE : 'शासकीय अभियांत्रिकी' संकुलाचे आज भूमिपूजन

कोल्हापूर : येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नवीन संकुलाचे भूमिपूजन गुरुवारी (ता. १९) सकाळी साडेदहा वाजता उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे. शासकीय तंत्रनिकेतनच्या विद्यार्थी वसतिगृहाशेजारी होणाऱ्या या कार्यक्रमास पालकमंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष आमदार प्रकाश आबिटकर आदींसह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, उच्च व तंत्रशिक्षण विभागातील अधिकारी प्रमुख उपस्थित असणार आहेत.

One Nation One Election LIVE : एकत्र निवडणुकीच्या शिफारशींना केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरी

Latest Marathi Live Updates 19 September 2024 : देशात एकत्रितपणे निवडणुका घेण्याबाबत माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद समितीने केलेल्या शिफारशींना केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलीये. तसेच निपाह विषाणूमुळे बंगळूरच्या एका विद्यार्थ्याचा केरळमध्ये मृत्यू झाला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज श्रीनगर दौरा करणार आहेत. राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण पहायला मिळत आहे, त्यामुळे काही जिल्ह्यांत जोरदार पाऊस पडत आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.