आगामी विधानसभेसाठी केंद्रीय निवडणूक आयोग महाराष्ट्र मध्ये येऊन आढावा घेणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाची अधिकारी 26 तारखेला मुंबईमध्ये दाखल होणार आहे. 27 तारखेला सकाळी दहा वाजता पॉलिटिकल पार्टी यांच्याबरोबर चर्चा करणार आहेत.
20-21 सप्टेंबरच्या मध्यरात्री, मुंबई कस्टम्सने दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये सुमारे 1.58 कोटी रुपये किमतीचे 2.286 किलो वजनाचे सोने आणि रुपये 1.54 कोटी किमतीचे हिरे जप्त केले. तीन प्रवाशांना अटक करण्यात आली.
चतुर्भुज शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी, संयुक्त राष्ट्रांच्या प्रमुख बैठकीला संबोधित करण्यासाठी पंतप्रधान मोदी अमेरिकेतील फिलाडेल्फिया विमानतळावर तीन दिवसांच्या भेटीसाठी उतरले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "ठाण्यात पहिल्यांदाच एवढी मोठी परिषद होत आहे. NITI आयोगाच्या B.V.R. सुब्रह्मण्यम यांच्यासोबत बैठक झाली. पंतप्रधानांनी मुंबई MMR च्या क्षमतेचे स्वप्न पाहिले आहे. मुंबई आणि MMR मध्ये क्षमता आहे. 1.5 ट्रिलियन नीती आयोगाने 8 सेक्टर सुचवले आहेत, ज्याची सुरुवात ठाण्यापासून होते.
अनधिकृतपणे रिक्षा चालविणाऱ्या रिक्षा चालकाला मनसैनिकांनी चोप दिला आहे. अंधेरी च्या जेबी नगर भागात महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे उपाध्यक्ष राज पार्टे आणि इतर पदाधिकारी कमानिमित गेले होते. या ठिकाणी एक रिक्षा चालक त्यांना संशयात्मक वाटला. त्यानी त्याला , लायसनस , बॅच , रिक्षा ची कागदपत्र मागितली. मात्र तो ती कागदपत्र दाखवू शकला नाही. यामुळे या मनसैनिकांनी त्याला चोप देत कारवाई ची मागणी केली.
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बनलेल्या 'लालबागचा राजा'च्या हुंडीत अर्पण करण्यात आलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या मोजणी पूर्ण झाली आहे. आज लालबाग राजाच्या दरबारात भक्तांच्या उपस्थितीत ‘राजा’ला अर्पण करण्यात आलेल्या दागिन्यांचा लिलाव करण्यात आता सुरुवात झाली आहे. सोन्या-चांदीचे लहान-मोठे तब्बल साडेचार किलो पेक्षा अधिक वजनाचे दागिने गणेश भक्तांकडून अर्पण करण्यात आले आहेत.
मुंबई विद्यापीठ निवडणूक २४ तारखेला होणार आहे. एका रात्रीत तयारी करणे शक्य नाही म्हणून हायकोर्टाकडं यासाठी वेळ मागण्यात आला होता. त्यानंतर मुंबई हायकोर्टाकडून मुंबई विद्यापीठ दिलासा देण्यात आला आहे.
देशात जबरदस्त लढाई सुरू आहे...आणि आता तुम्ही जिंकण्याच्या जवळ आला आहात, जर तुम्ही पराभूत झाला असता तर हरियाणा सोबत महाराष्ट्राची निवडणूक लागली असती.. हरियाणामध्ये काँग्रेस 60 जिंकणार आणि भाजप 20 जागा जिंकणार. मोदी जर विनासुरक्षा गावात गेले तर काही खरं नाही, या लोकांनी सगळं गहाण ठेवलं आहे अदाणीकडे...यांना देशाबाबत काळजी नाही, असे मत सत्यपाल मलिक यांनी व्यक्त केले.
निर्धार महाराष्ट्राचा आणि भारत जोडो अभियान आयोजित जनसभा वाय बी चव्हाण सेंटर येथे आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जम्मू आणि काश्मीर, गोवा आणि मेघालयचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक उपस्थित आहेत. सोबतच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि अरविंद सावंत उपस्थित आहेत.
मुंबई विद्यापीठाच्या सिनेटची निवडणूक उद्याच होणार आहे. याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने याबद्दलचा निर्णय दिला आहे.
धारावी येथे उद्भवलेल्या तणावपूर्ण परिस्थितीसंदर्भात कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा आणि विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड हे धारावी पोलीस स्टेशन मध्ये पोहचले आहेत.
नागपूर - काँग्रेसची उद्या नागपूर विधानसभा आढावा बैठक होणार असून महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि स्थानिक काँग्रेस नेते आढावा बैठकीला उपस्थित राहणार आहेत. नागपुर शहरातील सहा विधानसभा मतदारसंघाचा काँग्रेस नेते आढावा घेणार आहेत. रजवाडा पॅलेस सभागृह येथे संध्याकाळी 6 वाजता आढावा बैठक होईल.
- नागपूर शहरातील सर्वच सहा विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा आहे. तर शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेचाही शहरातील 2 विधानसभा मतदारसंघावर दावा आहे. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीसाठी मतदारसंघाचा काँग्रेसकडून आढावा घेण्यात येत आहे.
-
वडीगोद्री येथे मराठा व ओबीसी आंदोलक समोरा समोर आल्याने तणाव निर्माण झाला आहे. याबद्दल बोलताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की," प्रत्येक समाजाला आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करण्याचा अधिकार आहे.. मात्र हे करत असताना कुठे हिंसा होणार नाही, दोन समाज समोरासमोर येणार नाही, समाजात तेढ निर्माण होणार नाही, हिंसा होणार नाही याची दक्षता त्या त्या समाजातील नेत्यांनी किंवा आंदोलन करणाऱ्यांनी घेतली पाहिजे."
अखिल भारतीय कृषी गोसेवा संघ पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मिलिंद एकबोटे आणि सहकार्यांचे गेली तीन दिवससुरु असलेले आळंदीतील देशी गोवंश बचाव जन आंदोलन भोसरी विधानसभा आमदार महेश लांडगे यांच्या शिष्टाईने आज मागे घेण्यात आले. यावेळी आमदार लांडगे यांनी उपोषणकर्ते एकबोटे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोबाईलवरून बोलणे करुन दिले.
अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे उपोषण करत आहे, वडीगोद्री येथे ओबीसी आंदोलक प्रा.लक्ष्मण हाके , नवनाथ वाघमारे व सोनिया नगर अंतरवाली सराटी येथे ओबीसी आंदोलक मंगेश ससाणे व सहकारी यांचे उपोषण सुरू आहे. वडीगोद्री येथे मराठा व ओबीसी आंदोलक समोरा समोर आल्याने तणाव निर्माण झाला आहे.
काँग्रेस पक्षाचे शिष्टमंडळ राजभवनावर राज्यपालांच्या भेटीला पोहोचले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य आणि प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खा. वर्षा. गायकवाड यांच्यासह काँग्रेस नेते उपस्थित.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात घेतली भेट
एअर मार्शल अमर प्रीत सिंग हे 30 सप्टेंबर रोजी निवृत्त होणाऱ्या एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी यांच्याकडून आयएएफचे पुढील प्रमुख म्हणून पदभार स्वीकारतील, अशी घोषणा सरकारने केली.
शिराळा : आरळा-बेरडेवाडी-कोकणेवाडी (ता. शिराळा) या रस्त्यासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून ५ कोटी ७४ लाख ६९ हजार रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती खासदार धैर्यशील माने यांनी दिली.
देशातील पारंपारिक कौशल्याला विकसित करण्यासाठी केंद्र शासन विश्वकर्मा योजनेद्वारे प्रयत्न करीत आहेत. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने शुक्रवारी जिल्ह्यातील २८ महाविद्यालयांत केंद्रे स्थापन करण्यात आली.
धाराशिव जिल्हा बॅंकेला गर्तेतून बाहेर काढण्यासाठी किमान २ लाख सर्वसामान्य नागरिकांना सभासद करून घेण्याचे प्रयत्न आहेत. प्रतिसभासद १० हजार रुपये यानुसार एकूण २०० कोटी रुपयांचे भांडवल गोळा करण्याचे प्रयत्न होणार आहेत. या संबंधीच्या निर्णयावर सनियंत्रण समितीच्या बैठकीत संचालक मंडळासह सहभागी पतसंस्थांच्या प्रतिनिधींचे एकमत झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
मोटार वाहन विभाग (RTO) कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्यचा बेमुदत संप अटळ असणार आहे. २४ सप्टेंबर २०२४ पासून हे लोक संप करणार आहेत.
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट आरक्षण मिळावे, या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे सहाव्यांदा उपोषण सुरू केले आहे.उपोषणाच्या समर्थनार्थ आज शनिवारी (ता. २१) बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.
वडगावशेरीत दुकानाला मोठी आग लागली आहे.
मुंबईचे अतिरिक्त आयुक्त धारावी परिसरात दाखल झाले आहेत
धारावीमध्ये धार्मिक स्थळाचा भाग तोडण्यावरून स्थानिकांनी घातला धारावी पोलीस ठाण्याला घेराव घातला आहे. जोवर पालिकेच पथक परत जाणार नाही तोवर आम्ही मागे हटणार नाही एस्थानिकांची भूमिका
धारावीमध्ये धार्मिक स्थळाचा भाग तोडण्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. बीएमसीच्या पथकाच्या गाडीची तोडफोड झाली आहे. दगडफेक देखील झाल्याची माहिती आहे.
अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाऊंडेशनचा नववा वर्धापन दिवस आहे. पुण्यातील गणेश कला-क्रीडा रंगमंच येथे नवव्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री गुजरातचे सी.आर. पाटील यांच्या उपस्थितीत वर्धापन दिन कार्यक्रम होणार आहे. नाम फाऊंडेशन कडून राज्यभरात जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत.
शरद पोंक्षे यांनी राहूल गांधी यांच्यावर टीका केली आहे. भारतरत्न दिला तर भाजप सरकारचं देवू शकतं. आता जे काही आहेत परदेशात जाऊन बदनामी करत असतात .सारखं माफीवीर माफीवीर म्हणून बोलत असतात. त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार. मात्र भारतरत्न पुरस्काराच्या पलिकडे सावरकर आहेत. मी आता त्या पलीकडे गेलो आहे, असं ते म्हणाले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर महायुतीतील तीनही पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या मॅरेथाॅन बैठका सुरू झाल्या आहेत. शिवसेनेकडून स्टॅडिग उमेदवारांना पहिला, तर शिवसेनेने लढवलेल्या जागांना दुसरा प्रेफरन्स देण्यात येत आहे.
लोकसभा निवडणुकीत स्ट्राईक रेट चांगला ठेवलेल्या शिवसेनेला कमीत कमी १०० तर जास्तीत जास्त १२१ जागा हव्यात. सप्टेंबर अखेरपर्यंत जागा वाटपाचा तिढा सोडवण्याचा महायुतीतील नेत्यांचा मानस आहे. लोकसभेला झालेल्या चुकांची पुनरावृत्ती विधानसभेला होणार नाही. शिवसेनेचे उमेदवार शिवसेनेचे नेतेच ठरवतील....यात भाजप नेत्यांचा हस्तक्षेप नसणार अशी सूत्रांची माहिती आहे.
पुणे : दौंड ते मनमाड सेक्शन दरम्यान असलेल्या राहुरी-पढेगाव स्थानकांदरम्यान नॉन इंटरलॉकिंगचे काम होणार आहे. त्यामुळे २१ ते २३ सप्टेंबर दरम्यान पुण्याहून सुटणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहे. त्यामुळे रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक विस्कळित होणार आहे. याचा फटका प्रवाशांना बसणार आहे.
मुंबईतील जुहू बीचवर स्वच्छता मोहिमेदरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्रॅक्टर चालवला. या कार्यक्रमाला राज्यपाल सीपी राधाकृष्णन आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादवही उपस्थित होते.
धामोड : येथील तुळशी धरणाच्या पायथ्याशी मृतदेहाचा सांगाडा सापडला. कृष्णात शिवाजी मांढरेकर (वय ४६, रा. कांबळवाडी, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. गेल्या महिन्यापासून ते घरातून बेपत्ता होते. याबाबतची वर्दी दिगंबर दिनकर दळवी यांनी राधानगरी पोलिसांत दिली. काल सकाळी ११ वाजता त्यांच्या मृतदेहाचा सांगाडा जनावरे चारण्यासाठी गेलेल्या दिगंबर तामकर यांना दिसला. याबाबतची माहिती त्यांनी राधानगरी पोलिसांना दिली. कुरणेवाडी (ता. राधानगरी) येथील भाचा दिगंबर दिनकर दळवी यांनी ओळखला.
कोलंबो : श्रीलंकेसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण, आज राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झालीये. 2022 मधील सर्वात वाईट आर्थिक मंदीनंतर श्रीलंका सरकारला जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी 38 उमेदवार रिंगणात आहेत.
भाजपच्या तीन नेत्यांना डीपीडीसीमधून निधी मंजूर झाला आहे. हर्षवर्धन पाटील, आशा बुचके आणि बाळा भेगडे यांना १ कोटी रुपये निधी मंजूर झाला. आशा बुचके यांनी तर थेट अजित पवारांना काळे झेंडे दाखवले होते. मात्र, हे तीन बंडखोरी करणार की काय? अशी चर्चा असतानाच डीपीडीसीतून निधी मंजूर झाल्याची चर्चा आहे. तर, कांग्रेसच्या दोन आमदार आणि शरद पवार गटाच्या एका आमदाराला निधी वाटपातून वगळलं असल्याची चर्चा आहे
PM नरेंद्र मोदी यांचा तीन दिवसीय United States दौरा आजपासून सुरू होत आहे. ते न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या QUAD लीडर्स समिट आणि समिट ऑफ द फ्युचर (SOTF) मध्ये सहभागी होणार आहेत. या दौऱ्यात ते काही महत्त्वाच्या द्विपक्षीय बैठकाही घेणार आहेत.
खंडाळा : सातारा-पुणे महामार्गावरील खंबाटकी घाटात (Khambatki Ghat Accident) रात्री एक वाजण्याच्या सुमारास तामिळनाडू वरून मुंबईकडे जाणाऱ्या मालट्रकचा ब्रेक फेल झाल्याने, ट्रकने लागोपाठ चार कार गाड्यांना उडविले. या अपघातात प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. मात्र, कोणतीही जीवितहानी झालेली नाही. इथे क्लिक करा
कोलकता : पश्चिम बंगालमधील आरजी कर रुग्णालयात महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ राज्यातील निवासी डॉक्टरांनी सुरू केलेले काम बंद आंदोलन काल संध्याकाळी मागे घेतले. आजपासून (ता. २१) अत्यावश्यक सेवांसाठी उपलब्ध राहणार असल्याचे या निवासी डॉक्टरांनी सांगितले.
नवी दिल्ली : दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री आतिशी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. आतिशी यांच्यासोबत ५ आमदार देखील मंत्रिपदाची शपथ घेतील. गोपाल राय, कैलाश गेहलोत, सौरभ भारद्वाज आणि इम्रान हुसैन हे कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. आतिशी यांच्यासोबत हे सर्व मंत्री आज सायंकाळी ४.३० वाजता पदाची शपथ घेतील.
Latest Marathi Live Updates 21 September 2024 : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन बुधवारी (ता.२५) जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. ते त्या दिवशी शासकीय विश्रामगृह येथे दिवसभर विविध घटकांच्या प्रतिनिधींशी संवाद साधणार आहेत. तर, दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री आतिशी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. तसेच यंदाच्या म्हैसूर दसऱ्याचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक ‘हंपना’ तथा एच. पी. नागराजय्या यांच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) पंजाबमधील चार ठिकाणांवर छापे टाकले. तिरुपतीच्या बालाजी मंदिरातील प्रसादात जनावरांच्या चरबीचा वापर केला जात असल्याप्रकरणी केंद्र सरकारने आंध्र प्रदेश सरकारकडून माहिती मागविलीये. मध्यवर्ती काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांना घेऊन जाणारी बस खोल दरीमध्ये कोसळून झालेल्या भीषण अपघातात तिघाजणांचा मृत्यू झाला असून अन्य ३२ जण जखमी झाले आहेत. त्याचबरोबर राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण पहायला मिळत आहे, त्यामुळे काही जिल्ह्यांत जोरदार पाऊस पडत आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.