वाहन उद्योगातील आघाडीची कंपनी 'बजाज ऑटो'चे अध्यक्ष राहुल बजाज (Rahul Bajaj) यांचे आज निधन झाले. वयाच्या 83 व्या वर्षी पुण्यामध्ये त्यांचं निधन झालं. विदेशी कंपन्यांच्या स्पर्धेला आव्हान देत 'बजाज ऑटो' (Bajaj) कंपनीला त्यांनी भारतातच नाही तर जगभरात पोहोचवलं. आपल्या स्पष्ट भूमिकेसाठी राहुल बजाज उद्योग जगतात प्रसिद्ध होते. गेल्या पाच दशकांमध्ये बजाज समूहाला नावारूपाला आणण्यात राहुल बजाज यांचं योगदान मोठं आहे. (Senior industrialist Rahul Bajaj has passed away today.)
१० जून १९३८ रोजी राहूल बजाज यांचा जन्म झाला. त्यांनी अर्थशास्त्र आणि विधीमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलं.
नंतरच्या काळात त्यांनी हॉवर्ड विद्यापीठातून 'एमबीए'चे शिक्षण घेतले आहे.
१९६८ मध्ये राहुल बजाज हे बजाज ऑटोमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) या पदावर रुजू झाले. १९७२ मध्ये त्यांनी 'बजाज ऑटो'ची सूत्रे हाती घेतली.
अनेक परदेशी कंपन्यांच्या आव्हानाला सामोरं जात त्यांनी भारतात बजाज कंपनीला नावारुपास आणले.
आज बजाज फक्त भारतातच नाही तर जगभरातील विविध देशांत पोहोचली आहे.
याचं श्रेय राहुल बजाज यांना जातं. यातून एका स्वदेशी कंपनी होण्याबरोबरच बजाजने अनेक लोकांना रोजगार मिळाले.
२००१ मध्ये राहुल बजाज यांना 'पद्मभूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
'फोर्ब्स'च्या श्रीमंत भारतीयांच्या यादीत राजीव बजाज यांचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.