Buldhana Bus Accident : बुलढाणा भीषण अपघातावर PM मोदींनी व्यक्त केला शोक; जाहीर केली मदत

Buldhana Bus Accident PM Modi Expresses Grief Over  Bus Accident, Announces Rs 2 Lakh Ex Gratia
Buldhana Bus Accident PM Modi Expresses Grief Over Bus Accident, Announces Rs 2 Lakh Ex Gratia sakal
Updated on

बुलढाण्यातील समृद्धी महामार्गावर मध्यरात्री झालेल्या भीषण बस अपघातात 25 प्रवाशांचा होपपळून मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. ही बस नागपूरहून पुण्याच्या दिशेने चालली होती. त्यावेळी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ हा अपघात झाला.

दरम्यान या बस अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शोक व्यक्त केला, तसेच अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांना 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

महाराष्ट्रातील बुलढाणा येथे झालेल्या भीषण बस दुर्घटनेने खूप दु:ख झाले आहे. ज्यांनी प्राण गमावले त्यांच्या कुटुंबियांसोबत माझ्आ प्रार्थना आहेत. जखमी लवकर बरे व्हावेत. स्थानिक प्रशासन बाधितांना शक्य ती सर्व मदत करत आहे.

बुलढाणा येथील बस दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना PMNRF कडून 2 लाख रुपयांची मदत दिली जाईल. जखमींना 50,000 रुपये दिले जातील, पंतप्रधान कार्यालयाकडून करण्यात आलेल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे.

Buldhana Bus Accident PM Modi Expresses Grief Over  Bus Accident, Announces Rs 2 Lakh Ex Gratia
Buldhana Bus Accident : अपघात सदोष निर्मिती अन् मानवी त्रुटींमुळे…; भीषण अपघातानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया

राज्य सरकारकडून पाच लाखांची मदत

या भीषण अपघातात 25 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर आठ जण या घटनेत सुखरुप बचावले आहेत. दरम्यान या मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. या अपघाताच्या घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. तर अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांच्या उपचाराचा सर्व खर्च सरकार करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे

Buldhana Bus Accident PM Modi Expresses Grief Over  Bus Accident, Announces Rs 2 Lakh Ex Gratia
Mumbai Rain Update : आजही पाऊस झोडपणार! मुंबई, ठाण्यासह पालघरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.