Buldhana Bus Accident: यंत्रणा वेळेत दाखल पण 'ही' गोष्ट ठरली मृत्यूला कारणीभूत; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली खंत

समृद्धी महामार्गावर सिंदखेड राजा इथं हा भीषण अपघात झाला यामध्ये बस जळून खाक झाली.
cm Eknath Shinde
cm Eknath Shinde Esakal
Updated on

Buldhana Bus Accident : बुलडाण्यातील सिंदखेडराजा इथं समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण बस अपघातात २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर ८ जण बचावले आहेत. दुर्घटनेनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत बसला लागलेल्या आगीत लोकांचा होरपळून मृत्यू झाला होता.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी यंत्रणा वेळेत पोहोचल्याचं सांगत बसचा दरवाजा बंद असल्यानं काही करता आलं नसल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं आहे. (Buldhana Bus Accident system arrived in time but this thing turned out to be cause of death CM Shinde told reason)

मुख्यमंत्री म्हणाले, "अपघातानंतर दुर्घटना ज्या ठिकाणी घडली त्या ठिकाणी क्विक रिस्पॉन्स व्हेईकल, फायरब्रिगेडच्या गाड्या या युद्धपातळीवर पोहोचल्या. पण दुर्देवानं बसचा दरवाजा बंद असल्यानं त्यांना बाहेर काढता आलं नाही. अन्यथा आणखी काही लोक वाचले असते. यातून आठ लोक त्यातून वाचले आहेत" (Latest Marathi News)

cm Eknath Shinde
Buldhana Bus Accident : 'समृद्धी'वर अपघातात मृत्यू झाल्यास लोक म्हणतात देवेंद्रवासी झाला; पवारांचा फडणवीसांना टोला

दरम्यान, पोलिसांचं म्हणणं आहे की, रात्री 1.35 वाजण्याच्या सुमारास सिंदखेडराजा जवळच्या पिंपळखोटा गावाजवळ हा अपघात झाला. यामध्ये २५ मृतदेह आम्ही बाहेर काढले आहेत. तर ८ जण यातून वाचले आहेत. जे लोक वाचले त्यांनी बसच्या काचा फोडून आपला जीव वाचवला, अशी माहिती बुलडाण्याचे पोलीस आयुक्त सुनील कडास्ते यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.