Buldhana: भरधाव वेगात असलेल्या स्कार्पिओचे नियंत्रण सुटले, एक ठार

 भरधाव वेगात असलेल्या स्कार्पिओचे नियंत्रण सुटले, एक ठार
Pune News:sakal
Updated on

Accidnet News: खामगाव:भरभाव वेगात स्कार्पिओ कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार पलटी होऊन एक जण ठार तर चार जण जखमी झाल्याची घटना आंबेटाकळी ते बोरी अडगाव रोडवर आज दिनांक २६ मे रोजी पहाटे ६ वाजेदरम्यान घडली.

मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर असे की,स्कार्पिओ कार क्रमांक एम एच 33.AC.2366 हि शेगावकडे जात असताना भरभाव वेगातील कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने सदर कार ही आंबेटाकळी ते बोरी अडगाव रोडवर पलटी झाली. नागरिकांनी अपघातातील जखमींना लगेच खामगाव येथील सामान्य रुग्णालयात पाठविले होते.

या अपघातात देवराव रावजी भंडारकर वय 55 वर्ष राहणार गडचिरोली, हे जागीच ठार झाले आहे.

तर कार मधील सौ कांता देवराव भंडारकर वय 50 वर्ष, जयदेव नामदेव नाकाडू वय 40 वर्ष, जयश्री राऊत वय 16 वर्ष, समृद्धी कोमलवार वय 6 वर्ष सर्व राहणार तळेगाव ता कुरखेड जिल्हा गडचिरोली,हे चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांना खामगाव सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांनी प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी अकोला रेफर करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com