Mumbai Ahmedabad Bullet Train: देशातील पहिल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. आता बुलेट ट्रेन ऑपरेटर आणि चालकांचा २० पदासाठी नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशनने (एनएचएसआरसीएल) अर्ज मागितले आहे.
नुकताच यांसंदर्भात जाहिरात प्रकशित केली असून या सर्वांना जापानमध्ये प्रशिक्षण देणार असल्याची माहिती समोर आली आहे. या पदासाठी रेल्वेचे लोको पायलेट, मोटरमॅन आणि मेट्रोचा चालकांना प्राधान्य देण्यात येणार आहे
बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित देशातील पहिल्या मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम सध्या गुजरातमध्ये प्रगतिपथावर असून २०२७ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणार असल्याचा दावा केला जात आहे; तर एनएचएसआरसीएलकडून बुलेट ट्रेन चालवणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीची तयारी सुरु करण्यात आले आहे.
नुकतेच नॅशनल हाय स्पीडने मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल कॉरिडॉरमध्ये बुलेट ट्रेन ऑपरेटर आणि चालकांचा २० पदासाठी अर्ज मागितले आहे. या संदर्भात जाहिरात सुद्धा देण्यात आली आहे. विशेष म्हणजे अर्ज करण्याची अंतिम तारीख ७ डिसेंबर २०२३ आहे. बुलेट ट्रेन ऑपरेटर आणि चालकांचा पदासाठी भारतीय रेल्वे / सरकारांच्या मेट्रो रेल्वेच्या चालक / ट्रेन ऑपरेटर आणि लोको पायलेट याकरिता अर्ज करू शकते. विशेष म्हणजे निवड झालेल्या अर्जदारांना प्रशिक्षण जपानमध्ये देण्यात येणार असल्याची माहिती नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशनच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
काय आहे जाहिरात ?
मुंबई- अहमदाबाद हाय स्पीड रेल कॉरिडॉर ( एनएचएसआरसीएल ) साठी नियमित आधारावर कंपनीमध्ये सामील होण्यासाठी भारतीय रेल्वे / सरकारच्या मालकीच्या मेट्रो रेल्वेच्या चालक / ट्रेन ऑपरेटर / लोको पायलट, हाय स्पीड रेल पायलट (हाय स्पीड ट्रेन ऑपरेटर / ड्रायव्हर्स) च्या 20 पदांसाठी अर्ज मागितले आहे. याशिवाय काँट्रॅक्टस,रोलिंग स्टॉक, रोलिंग स्टॉक डेपो, डेटाबेस प्रशासन, ट्रॅक मानव संसाधन, वित्त आणि आर्किटेक्चर या पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहे.
२०१ कोटी पाण्यात का ?
एकीकडे बुलेट ट्रेन ऑपरेटर आणि चालकांचा २० पदासाठी नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशनने (एनएचएसआरसीएल) अर्ज मागितले आहे. तर दुसरीकडे गेल्या वर्षी २०१ कोटी रुपयांच्या बुलेट ट्रेनच्या चालकांना प्रशिक्षण देण्यासाठी १२ सिम्युलेटर मशीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता.
यासंदर्भात जपानच्या मेसर्स मित्सुबिशी प्रेसिजन कंपनीशी नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशनचा २०१ कोटी रुपयांचा करारही झाला. येत्या अडीच वर्षांत या अत्याधुनिक बुलेट ट्रेनचे प्रशिक्षण देणाऱ्या १२ सिम्युलेटर मशीन भारतात दाखल होणार असल्याची माहिती देण्यात आली होती.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.