Bullock Cart Race : राज्यातील बैलगाडा शर्यती निर्बंध मुक्त होणार - खासदार श्रीकांत शिंदे

तामिळनाडूतील जलीकट्टूच्या धर्तीवर महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यत देखील निर्बंधमुक्त होतील असे आश्वासन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी बैलगाडा प्रेमींना दिले.
MP Shrinakt Shinde
MP Shrinakt Shindesakal
Updated on
Summary

तामिळनाडूतील जलीकट्टूच्या धर्तीवर महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यत देखील निर्बंधमुक्त होतील असे आश्वासन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी बैलगाडा प्रेमींना दिले.

डोंबिवली - तामिळनाडूतील जलीकट्टूच्या धर्तीवर महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यत देखील निर्बंधमुक्त होतील असे आश्वासन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी बैलगाडा प्रेमींना दिले. उसाटने येथे खासदार केसरी स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना खासदार शिंदे यांनी बैलगाडा शर्यत निर्बंध मुक्त करण्यासाठी राज्य शासन सुप्रीम कोर्टात आपली बाजू भक्कम मांडणार असल्याचे देखील सांगितले.

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत एन.डी.पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे जिल्ह्यात कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नावे खासदार केसरी भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. आकर्षक बक्षिसांसह सन्मानचिन्ह आणि रोख पारितोषिकांची लयलूट या स्पर्धेत होती. ठाणे जिल्ह्यात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात बैलगाडा शर्यत भरविण्यात आल्याने राज्यभरातून बैलगाडा प्रेमींनी या स्पर्धेला गर्दी केली होती.

खासदार डॉ. शिंदे यांनी बैलांच्या छकड्यावर बसून शर्यतीच्या मैदानात प्रवेश केला आणि एकच धुवा उडाला. यावेळी कल्याण पूर्व शहर प्रमुख महेश गायकवाड, विभाग प्रमुख चैनु जाधव, हिरामण पितळे, राहूल पाटील, कुणाल पाटील, किशोर पाटील यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. राज्यात बैलगाडा शर्यतींना सुप्रीम कोर्टाने अटी शर्थींसह परवानगी दिली आहे. मात्र ही प्रक्रीया अत्यंत किचकट असल्याने आयोजकांना स्पर्धा भरविणे तसेच त्यात सहभागी होणाऱ्या बैलगाडा मालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तामिळनाडू मध्ये जलीकट्टूवरील निर्बंध हटविण्यात आले आहे. याच धर्तीवर राज्यात देखील बैलगाडा शर्यतींना सूट देण्यात यावी अशी मागणी होत आहे.

याविषयी बैलगाडा प्रेमींना संबोधित करताना खासदार डॉ. शिंदे म्हणाले, इतर राज्यांच्या धर्तीवर राज्यात देखील बैलगाडा शर्यतींना सूट कशी देण्यात येईल यासाठी महाराष्ट्र सरकार काम करणार आहे असे ते म्हणाले. या स्पर्धेला मोठ्या संख्येने राज्यभरातील बैलगाडा मालक आणि प्रेक्षक देखील उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.