सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) आज बैलगाडा शर्यती (Bullock Cart Race) संदर्भात सुनावणी केली आहे. यात काही नियम आणि अटी घालून ही परवानगी देण्यात आली आहे. मात्र असं असलं तरी हे प्रकरण सदस्य पाच खंडपीठाकडे जाणार आहे. यावरुन भाजपाचे चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी प्रतिक्रीयी दिली आहे.
ते म्हणतात, मी या निर्णयाचं स्वागत करतो. ही सामान्य, ग्रामीण जनतेची आणि लोकांची मानसिक आवश्यकता होती. यासंबंधित आंदोलन केलेल्या नेतृत्वांच अभिनंदन करतो. २०११ मध्ये केंद्रातील कॉंग्रेस सरकारने याला स्थिगिती दिली होती. यानंतर प्रकाश जावडेकर (prakash javadekar) यांनी मोदी सरकारच्या (Modi government) काळात यावरील बंदी उठवली. दरम्यान, त्याचवेळी सर्वोच्च न्यायलयात याविषयी याचिका दाखल करण्यात आली होती. यावेळी तामिळनाडू, केरळ, कर्नाटक (karnataka) आणि महाराष्ट्रातूनही (Maharashtra) याचिका दाखल करण्यात आल्या. संपूर्ण महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठवण्यात आली आहे. आता या याचिका फेटाळून लावल्या असून यासाठी लढा दिलेल्या सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो.
दरम्यान, याविषयी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip valase-patil) यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही बैल हा धावणारा प्राणी आहे हे सिद्ध करणारा अहवाल दोन महिन्यात तयार करून सर्वोच्च न्यायालयात सादर केला, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. गेले काही दिवस संपूर्ण राज्याचे बैलगाडा शर्यतीवर सुनावणीकडे लक्ष लागून राहिले होते. महाराष्ट्रात (Maharashtra) पुन्हा शर्यतीचा धुराळा उडणार आहे. आज 3 न्यायाधीशांच्या बेंचसमोर सुनावणी झाली. यामध्ये न्यायाधीश खानविलकर, न्यायाधीश रविकुमार, न्यायाधीश माहेश्वरी समावेश होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.