आर्यनचा जेलमधील मित्र असल्याची मारली बढाई; पोलिसांनी पुन्हा केली अटक

आर्यनचा जेलमधील मित्र असल्याची मारली बढाई; पोलिसांनी पुन्हा केली अटक
Updated on

मुंबई: आर्यन खानसोबत मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात एकत्र असल्याची बढाई मारणे आणि तशा मुलाखती न्यूज चॅनेल्सना देणं एका युवकाला महागात पडलं आहे. या युवकाचं नाव श्रवण नाडर असं असून आपण आर्यन खानसोबत तुरुंगात एकत्र होतो, असा दावा हा युवक करत होता आणि आता पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याची झालेली अटक ही मागील एका प्रलंबित प्रकरणासाठी झालेली आहे. न्यूज चॅनेल्सना बढाई मारणाऱ्या मुलाखती दिल्याने पोलिसांनी त्याला ओळखलं आणि त्याला अटक केली.

आर्यनचा जेलमधील मित्र असल्याची मारली बढाई; पोलिसांनी पुन्हा केली अटक
किंग खानची 'मास्टरमाईंड' पूजा ददलानी आहे कोण?

श्रवण नाडर हा मूळचा तमिळनाडूचा आहे. तो मानखुर्दचा रहिवासी आहे. एका चोरीच्या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली होती आणि त्याला आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात आलं होतं. शनिवारी त्याने चॅनेलला मुलाखती देताना अशी बढाई मारली की, आर्यन खानला ज्या बॅरेकमध्ये ठेवण्यात आलं होतं त्याच बॅरेकमध्ये त्यालाही ठेवण्यात आलं होतं. या प्रकारची बढाई मारुन तो प्रसिद्धी मिळवू पाहत होता. त्याने मुलाखतीत दावा केलाय की, ते दोघेही जवळपास एकाच वेळेला आर्थर रोड तुरुंगात आले होते. जवळपास 10 दिवस ते एकत्र होते त्यानंतर त्याला जामीन मिळाल्याने तो बाहेर आला. गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने आर्यन आणि इतर दोघांना जामीन मंजूर केला तेव्हा आर्यन बाहेर येईल या अपेक्षेने नाडर आर्थर रोड तुरुंगात गेला, पण तसं घडलं नाही.

आर्यनचा जेलमधील मित्र असल्याची मारली बढाई; पोलिसांनी पुन्हा केली अटक
T20 World Cup : आफ्रिदीच्या कामगिरीची पुनरावृत्ती करायचीय : बोल्ट

यावेळी नाडरने काही माध्यमकर्मीयांशी संवाद साधला आणि त्याने दावा की, मी आर्यनला तुरुंगात रडताना पाहिलं आणि त्याने केसदेखील कापले होते. तसेच आर्यनने त्याला विनंती केली होती की, तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर त्याने त्याच्या वडिलांना म्हणजेच शाहरुख खानला जाऊन भेटावं आणि मला तुरुंगात काही पैसे पाठवावेत. त्यानुसारच, तो वांद्रे येथील शाहरुख खानच्या घराबाहेर आर्यनच्या कुटुंबीयांना भेटायला तसेच त्यांना हा संदेश द्यायला गेला होता. मात्र, सुरक्षारक्षकांनी त्याला हुसकावून लावले.

"आर्यनने नाडरला त्याच्या कुटुंबीयांना संदेश पाठवायला सांगितलं होतं की नाही हे स्पष्ट नाही मात्र, एक गोष्ट खरी निघाली की, आर्यनला जिथे ठेवण्यात आले होते त्या बॅरेक क्रमांक 1 मध्ये तो देखील होता," असं एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितलंय.

आर्यनचा जेलमधील मित्र असल्याची मारली बढाई; पोलिसांनी पुन्हा केली अटक
बालिकेवर लैगिंक अत्याचार; आरोपीला 14 वर्षांचा कारावास

नाडर जेंव्हा चॅनेल्सना मुलाखती देण्यात व्यस्त होता, तेंव्हा योगायोगाने, गेल्या आठ महिन्यांपासून घरफोडीच्या प्रकरणात नाडरचा शोध घेत असलेल्या जुहू पोलीस अधिकाऱ्यांनी त्याला टीव्हीवर पाहिले. त्यांनी ताबडतोब स्थानिक गुन्हे शाखेच्या (युनिट-3) अधिकाऱ्यांना सूचना दिल्या, त्यानंतर नाडरला कारागृहाच्या बाहेरून ताबडतोब ताब्यात घेण्यात आले आणि गुन्हे शाखेच्या युनिटमध्ये नेण्यात आले. नंतर त्याला जुहू पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

जुहू पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शशिकांत माने म्हणाले, “नादरवर घरफोडी आणि चोरीचे १३ गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर आमच्या पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल असून गेल्या आठ महिन्यांपासून घरफोडीच्या एका प्रकरणी त्याचा शोध सुरु होता. शुक्रवारी स्थानिक न्यायालयाने त्याला १ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.