Accident News : ‘द्रुतगती’वर वारकऱ्यांवर काळाचा घाला;बस व ट्रॅक्टरची धडक,पाच ठार, ४२ जखमी

आषाढी वारीनिमित्त डोंबिवली येथून पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांच्या बसने ट्रॅक्टरला धडक दिल्याने मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पनवेलनजीक मंगळवारी पहाटे भीषण अपघात झाला.
Accident News
Accident Newssakal
Updated on

नवी मुंबई : आषाढी वारीनिमित्त डोंबिवली येथून पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांच्या बसने ट्रॅक्टरला धडक दिल्याने मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पनवेलनजीक मंगळवारी पहाटे भीषण अपघात झाला. यात बसमधील तीन, तर ट्रॅक्टरमधील दोन अशा एकूण पाच जणांचा मृत्यू झाला, तर इतर ४२ वारकरी जखमी झाले. जखमींना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी मृत ट्रॅक्टरचालकाविरोधात गुन्हा दाखल केला. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. तसेच मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची, तर जखमींवर मोफत उपचार करण्यात येणार असल्याचे जाहीर केले.

डोंबिवलीच्या निळजे घेसर येथील सत्यवान गायकर यांनी आषाढी वारीसाठी खासगी बसची व्यवस्था केली होती. डोंबिवलीसह दहिसर येथील २५ महिलांसह एकूण ५४ जण सोमवारी रात्री साडेदहा वाजता या बसने पंढरपूरसाठी निघाले. मध्यरात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास मुंबई-पुणे एक्स्प्रेस महामार्ग सुरू झाल्यानंतर सुमारे पाच किमी अंतरावर बसचालकाला पुढे असलेल्या ट्रॅक्टरचा अंदाज आला नाही.

भरधाव वेगात असलेल्या बसने ट्रॅक्टरला जोरात धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की बस रस्त्याच्या बाजूला असलेला संरक्षक कठडा तोडून पाईपलाईनवर धडकून उलटली. उपचारादरम्यान बसमधील एका महिलेसह तिघांचा, तसेच ट्रॅक्टरचालक व त्याच्या सहकाऱ्याचा मृत्यू झाला.

मृतांचीं नावे

बसमधील गुरुनाथ बापू पाटील (वय ७०), रामदास नारायण मुकादम (वय ७०) व हौसाबाई पाटील (वय ६५), ट्रॅक्टरचालक तरेवाज सलाउद्दीन अहमद (वय २७) आणि दीपक सोहन राजभर (वय ३०) यांचा मृत्यू झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.