Rojgar Melava: राज्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी पंडित दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन सर्वत्र केले जात आहे. त्यासाठी राज्यातील सर्वच औद्योगिक संघटनाना पत्र पाठवून तुमच्या परिसरातील कंपन्यांमध्ये किती मनुष्यबळाची गरज आहे याची माहिती मागीतली आहे. मात्र, आतापर्यंत फक्त दोनच टक्के कंपन्यांनी त्या पत्राला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे रोजगार मेळाव्याला मंदीचा फटका बसण्याचे संकेत मिळू लागले आहेत.
अर्थव्यवस्था मंदीच्या दिशेने हळूहळू वाटचाल करत आहे. त्यामुळेच नागपूर, पुण्यासह अनेक मोठ्या शहरांमध्ये आयटी, इंजीनिअरिंग, औषधी आणि प्लास्टिक उद्योगातील नोकर कपातीलाही सुरवात झालेली आहे.
इतरही क्षेत्रात नोकर कपात करण्यात आली नसली तरी नवीन मनुष्यबळाच्या भरतीवर निर्बंध आणलेले आहेत. युक्रेन-रशिया आणि इजराईल - हमास यामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे पेट्रोलियम पदार्थ्यांच्या दरात विक्रमी वाढ झालेली आहे. उद्योग सर्वाधिक प्रभावित झालेला आहे. या सर्व अस्थिरतेचा फटका आता राज्यातील पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याला बसण्याची शक्यता असल्याचे संकेत उद्योजकांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले.
सरकारच्या उपक्रमाला आम्ही सहकार्य करण्यासाठी तयार आहोत. बेरोजगारी वाढलेली आहे, रोजगार देण्याची इच्छाही आमची आहे. मात्र, अस्थिरतेमुळे मनुष्यबळाची गरज नसल्याने कोणाकडूनच त्याबद्दल मागणी नोंदवली जात नसल्याचेही त्यांनी सांगितले. (Latest Marathi News)
उद्योजकही चिंतेत
राज्यभरातून विविध क्षेत्रातील किमान १००० कंपन्याना यात प्राधान्याने सहभागी करून घेण्याचे नियोजन आहे. जिल्ह्यातील सर्व आस्थापनांनी या महारोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होऊन आस्थापनेवर असणाऱ्या रिक्तपदांबाबत माहिती मागवण्यात येत आहे. मात्र, त्याला अतिशय अल्प प्रतिसाद मिळत असल्याने संबधित विभागाचे धाबे दणाणले आहे. सध्या बाजारात उत्पादनाला मागणीही कमी झालेली आहे.
परिणामी, अनेक कंपन्यांनी उत्पादन कमी केले आहे. विदर्भातील अनेक औद्योगिक वसाहतीतील ५० ते ६० टक्के उद्योग बंदच आहेत. त्यात सुरू असलेल्या उद्योगांना मंदीसह विविध अडचणीचा सामना करावा लागत असल्याने रिक्त पदेच नाही. सध्या नवीन ऑर्डरही नसल्याने औद्योगिक संघटनांकडून आलेल्या पत्रांना काय उत्तर द्यावे या चिंतेच उद्योजक सापडले आहेत. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.