Pune Bypoll Election 2023: कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीबाबत अखेर अजित पवार बोलले; म्हणाले, प्रत्येकाला...

Ajit Pawar on Pune Bypoll Election 2023
Ajit Pawar on Pune Bypoll Election 2023esakal
Updated on

Pune Bypoll Election 2023 - पुणे जिल्ह्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीवरून सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या जागांसाठी महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाची शिवसेना देखील उत्सुक आहे.

मात्र कसबा विधानसभेची जागा काँग्रेसकडे असते. तर चिंचवडची जागा राष्ट्रवादीकडे आहे. आता याबाबत अजित पवार यांनी मोठं विधान केलं. (Kasba-Chinchwad by-election news in Marathi)

Ajit Pawar on Pune Bypoll Election 2023
Karnataka Election 2023: निवडणुकीपूर्वीच कर्नाटकात नवा वाद; जत्रेत बिगर हिंदू व्यापाऱ्यांवर बंदीची शक्यता?

अजित पवार म्हणाले की, शहरातील कार्यकर्त्यांना निवडणुकीबाबत काय वाटतं ते जाणून घेणार आहोत. आज काँग्रेसची बैठक आहे. याबाबत उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणं झालं आहे. मात्र आघाडीतून कोणती जागा कोण लढवणार, हा अंतिम निर्णय झालेला नाही. तो निर्णय वरिष्ठ पातळीवर तिन्ही पक्षाचे नेते घेतील. मात्र निवडणूक लढवायची असं म्हणण्याचा अधिकार सर्वांनाच आहे.

पूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोनच पक्ष होते. आता तीन पक्ष एकत्र आले असून महाविकास आघाडी झाली आहे. महाविकास आघाडीतील सर्व पक्षांना आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. मात्र एकत्र बसून जो निर्णय होईल, तो सर्वजन मान्य करतील, असं मला वाटतं, असही अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar on Pune Bypoll Election 2023
कोण होते मानस पगार? नाशिक निकालाच्या आधी सत्यजित तांबेंच्या जवळच्या सहकाऱ्याचे निधन

यावेळी जितेंद्र आव्हांडावर दाखल झालेल्या केसेसबाबत अजित पवार म्हणाले की, आधीही त्यांच्यावर दोन केसेस झाल्या. राजकारणात कोणी विरोधक असतं तर कोणी सत्ताधारी असतं. तरी राजकीय द्वेषातून कधीही अशाप्रकारे त्रास देऊ नये.

अडीच वर्षे आमचं सरकार होतं. आताचे सत्ताधारी म्हणतात की, आम्हाला अडकविण्याचा प्रयत्न झाला. अधिकाऱ्यांकडून आम्हाला ही माहिती मिळाल्याचा दावा ते करतात. मात्र आपण ३२ वर्षे झाले काम करतोय पण कधीही सत्तेचा गैरवापर केला नाही, असंही अजित पवारांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.