फडणवीसांप्रमाणेच भाजप पुन्हा आश्चर्यचकित करणार; ‘या’ दोन नावांचा समावेश

उद्धव ठाकरेंना दुखावणाऱ्या नेत्यांना महत्त्व
Cabinet Expansion Marathi News
Cabinet Expansion Marathi NewsCabinet Expansion Marathi News
Updated on

Cabinet Expansion मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet Expansion) शुक्रवारी (ता. ५) होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. अनेक दिवसांपासून विस्तार कधी होणार असा प्रश्न विचारला जात होता. कारण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन होऊन सव्वा महिना झाला आहे. आता मंत्रिमंडळातील संभाव्य दोन नावांवरून चर्चा सुरू झाली आहे.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ३० जून रोजी पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार असल्याचे जाहीर केले होते. तसेच आपण मंत्रिमंडळात नसणार असल्याचेही सांगितले होते. मात्र, सायंकाळपर्यंत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दबाव टाकल्याने देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. भाजपच्या या निर्णयाने सर्वजण चकित झाले होते. त्याचपद्धतीने विस्तारातील मंत्र्यांच्या (Cabinet Expansion) नावावरूनही धक्का बसू शकतो.

Cabinet Expansion Marathi News
Cabinet Expansion : ठरलं! रविवारपर्यंत होणार मंत्रिमंडळाचा विस्तार; केसरकर म्हणाले...

धक्कादायक नावांमध्ये अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) व नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांचा समावेश आहे. संभाव्य मंत्री शपथ घेऊ शकतात त्यात या दोघांच्या नावांचा समावेश आहे. रवी राणा हे विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील अपक्ष आमदार आहे. शिवसेना सोडलेले नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांना पक्षात घेण्याचीही चर्चा जोरात सुरू आहे.

रवी राणा आणि नितेश राणे (Nitesh Rane) ही दोन नावे आश्चर्यकारक मानली जात आहेत. विशेष म्हणजे जिथे शिवसेना कमकुवत आहे तिथे एकनाथ शिंदे गटातील लोकांना मंत्रिपद दिले जावे, याची विशेष काळजी मंत्रिमंडळ स्थापनेबाबत घेण्यात आली आहे. यामुळे उद्धव ठाकरे कमकुवत होण्यास मदत होईल, असा भाजपचा विश्वास आहे.

Cabinet Expansion Marathi News
Uddhav thackeray : उद्धव ठाकरेंचे एका बाणात दोन पक्षी! जळगावमध्ये म्हणाले...

ठाकरेंना दुखावणाऱ्या नेत्यांना महत्त्व

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर हनुमान चालिसा वाचण्याची घोषणा केल्याने आमदार रवी राणा व पत्नी खासदार नवनीत राणा वादात सापडले होते. राणा दाम्पत्यांना तुरुंगातही जावे लागले होते. तसेच राणे पिता-पुत्र नेहमीच शिवसेनेवर हल्ला करीत असतात. अशा स्थितीत भाजपने रवी राणांचा मंत्रिमंडळात समावेश केल्याने उद्धव ठाकरेंना दुखावणाऱ्या नेत्यांना महत्त्व दिले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.