NCP: तर 'त्याच' दिवशी शिंदे सरकार कोसळणार; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याचं भाकीत

भाजप नेत्यांमध्ये नाराजी? राष्ट्रवादीची प्रतिक्रिया
eknath shinde
eknath shindeesakal
Updated on

Eknath Shinde and Devendra Fadnavis: राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक राजकीय उलथापालथ झाली, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यामुळे भाजपच्या नेत्यानंमध्ये नाराजी पाहिला मिळाली होती, ही नाराजी चंद्रकांत पाटील यांनी बोलून देखील दाखवली होती, हे होत असताना मात्र राज्यात अनेक दिवस मंत्र्यांवीना राज्य चाललं होतं त्यामुळे विरोधकांनी शिंदे-फडणवीसांना धारेवर धरलं होतं.

eknath shinde
Gujarat Election Result 2022: गुजरात निकालावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले..."

अखेर शिंदे सरकारच्या मंत्रीमंडळाचा पहिला विस्तार झाला. त्यामध्ये शिंदे गटातील 9 आणि भाजपमधील 9 मंत्र्यांना कॅबिनेट मंत्रीपदाची गोपनीयतेची शपथ दिली. त्यामुळे शिंदे गटातील आणि अपक्ष आमदारांनी नाराजी उधड पणे बोलून दाखवली. मात्र ३ महिने उलटून ही राज्यात फक्त २० मंत्री कारभार चालवत आहेत.

सांगितलं जात होत की हिवाळी आधिवेशना आगोदर दुसरा मंत्रीमंडळ विस्तार केला जाईल मात्र अजून ही विस्तार होताना दिसत नाही. यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांचे ट्विट चर्चेत आले आहे. राज्यातील सरकार अस्थिर आहे का असा प्रश्न सर्व सामान्यांना पडला आहे.

हेही वाचा- Moonlighting And Tax Benefits : ‘मूनलायटिंग’च्या वाटे, नको ‘टॅक्स’चे काटे!

ट्विटमध्ये लिहिलं आहे की, 'कुणीतरी म्हणत होत की अधिवेशनापुर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, तो होणार नाही असं दिसतय. कारण ज्या दिवशी हा विस्तार होईल त्या दिवशी सरकार कोसळेल असे भाजपच्याच अनेक नेत्यांचे मत आहे.' त्यामुळे मंत्री पदासाठी अनेक आमदार इच्छूक आहेत मात्र मंत्री पदे कमी अशी स्थिती आत्ताच्या घडीला आहे. त्यामुळे आता सरकारचा विस्तार कधी होणार याकडे राज्याचं लक्ष्य लागून आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()