मंत्री स्तरावरील कोणतेही अधिकार सचिवांना दिलेले नाहीत; CM शिंदेंचे स्पष्टीकरण

अर्धन्यायिक प्रकरणांसाठीच आदेश असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे
Eknath shinde Latest News
Eknath shinde Latest NewsSakal
Updated on

Eknath shinde Latest News मुंबई : आज होईल, उद्या होईल अशीच वाट सर्वजण मंत्रिमंडळाच्या विस्ताराची (Cabinet Expansion) पाहत आहे. ५ ऑगस्टला विस्तार होईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली होती. मात्र, विस्तार काही झाला नाही. दुसरीकडे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे दिल्ली दौरेही थांबलेले नाही. तसेच सुप्रीम कोर्टातूनही निकाल यायचा आहे. हे सर्व होत असताना व मंत्रिमंडळाचा विस्तार टांगणीला असल्याने मंत्री आणि राज्यमंत्र्यांचे अधिकार सचिवांना दिल्याची बातमी आली. मात्र, अर्धन्यायिक प्रकरणे वगळता मंत्री स्तरावरील कोणतेही अधिकार सचिवांना दिलेले नाहीत, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून देण्यात आले.

शिंदे (Eknath Shinde) गट आणि भाजपचे सरकार ३० जून रोजी स्थापन झाले. तेव्हापासून मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet Expansion) झालेला नाही. आजवर विस्तारासाठी सूत्रांकडून अनेक तारखा मिळाल्या आहेत. मात्र, एकही तारीख खरी ठरली नाही. ५ ऑगस्टला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, अशी दाट शक्यता होती. मात्र, हेही तारीख खोटी ठरली. यामुळे महाराष्ट्रात मंत्र्यांअभावी अनेक विभागांच्या कामांवर परिणाम होत आहे. तसेच अनेक विकासकामे रखडली आहेत.

Eknath shinde Latest News
मुख्यमंत्र्यांनी दिल्ली दौरा, मंत्रिमंडळ विस्ताराचे कारण केले स्पष्ट; म्हणाले...

यावर तोडगा काढण्यासाठी आता मंत्री आणि राज्यमंत्र्यांचे अधिकार सचिवांना दिल्याचे वृत्त आले. यानंतर ‘अर्धन्यायिक प्रकरणे वगळता मंत्री स्तरावरील कोणतेही अधिकार सचिवांना दिलेले नाहीत. हे सर्व अधिकार पूर्वीप्रमाणेच मंत्री, मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळाकडेच आहेत. त्यामुळे सर्व निर्णयप्रक्रिया सचिवांच्या हातामध्ये देण्यात आली आहे असे म्हणणे पूर्णत: चुकीचे’ असे ट्विट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

मंत्र्यांनी घेतलेले निर्णय, तात्काळ आवश्यक असलेले अनेक आदेश, सर्व अधिकार मंत्र्यांकडे असते. महिनाभरापासून गृह, महसूल आणि शहरी विकास मंत्रालयात अनेक अपील प्रलंबित आहेत. दुसरीकडे नवीन सरकार स्थापन होऊन ३६ दिवसांपेक्षा जास्त काळ लोटला असला तरी अद्याप मंत्रिमंडळाची स्थापना झालेली नाही. मंत्रिमंडळ स्थापन न झाल्याने त्याचा परिणाम आता विभागांवर होत आहे, हे विशेष...

Eknath shinde Latest News
Accident In River Ganga : बोटीत सिलिंडरचा स्फोट होऊन ४ जणांचा मृत्यू

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. गुरुवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुद्द्यावर दिल्लीत पक्षाच्या प्रमुख नेत्यांची भेट घेतली होती.

सर्व काही ठरले तरीही...

महाराष्ट्रात सरकार स्थापन होऊन बऱ्याच कालावधीनंतर सरकारमधील मंत्र्यांबाबत भाजप आणि शिंदे गटमध्ये समझोता झाला आहे. भाजपच्या कोट्यातील आठ आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहे, तर शिंदे गटातील सात आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहे. मात्र, या यादीत महाराष्ट्राच्या मागील देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या अनेक ज्येष्ठ आमदारांची नावे कापण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.