सरकारमध्ये मंत्रिपदासाठी विशेष अट; ‘या’ माजी मंत्र्याचा पत्ता कापला जाऊ शकतो

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्या टप्प्यात नऊ माजी मंत्र्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला होता
Maharashtra Cabinet Expansion Latest News
Maharashtra Cabinet Expansion Latest NewsMaharashtra Cabinet Expansion Latest News
Updated on

Maharashtra Cabinet Expansion News मुंबई : महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet Expansion) कधी होईल, असा प्रश्न सातत्याने विचारला जात होता. मात्र, लवकरच विस्तार होईल याशिवाय कोणतेही उत्तर मिळत नव्हते. आता विस्तार मंगळवारी (ता. ९) होणार असल्याचे ठरले आहे. यासाठी काही मंत्र्यांना फोनही करण्यात आले आहेत. मंत्रिमंडळात सहभागी होण्यासाठी विशेष अट घालण्यात आल्याची माहिती आहे. यामुळे माजी मंत्र्याचा पत्ता कापला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महाराष्ट्रातील सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची (Cabinet Expansion) तारीख निश्चित झाली आहे. मंत्रिमंडळ विस्तारात स्वच्छ प्रतिमेच्या नेत्यांना संधी देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केले आहे. यामुळे स्वच्छ प्रतिमेच्या आमदारांनाच मंत्रिपद दिले जाणार आहेत. आता माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचा पत्ता कापला जाऊ शकतो.

Maharashtra Cabinet Expansion Latest News
मंत्री राकेश सचानवर गुन्हा कधी दाखल होणार? शिक्षेची ऑर्डर कॉपी घेऊन फरार

शिक्षक पात्रता चाचणी घोटाळ्यात अब्दुल सत्तार यांच्या मुली हिना आणि उज्मा यांच्या नावांचा समावेश आहे. दुसरीकडे मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाला फारसे महत्त्वाचे खाते दिले जाणार नसल्याची माहिती आहे. भाजपकडे (BJP) अर्थ, गृह आणि महसूल ही महत्त्वाची खाती असतील. महसूल मंत्रालय मिळावे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आग्रही आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्या टप्प्यात नऊ माजी मंत्र्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला होता. बंडखोरी केल्यानंतर उद्धव सरकारच्या या नऊ मंत्र्यांनी शिंदे यांना पाठिंबा दिला. या सर्वांना पहिल्या टप्प्यात मंत्रिपद मिळावे, अशी एकनाथ शिंदे यांची इच्छा होती. मात्र, यातील दोन ते तीन जणांची नावे कापली जाऊ शकतात, असे मानले जात आहे.

Maharashtra Cabinet Expansion Latest News
Rajinikanth : रजनीकांत पुन्हा राजकारणात प्रवेश करणार का? स्पष्टच दिले उत्तर

पहिल्या टप्प्यात १५ ते १८ मंत्री शपथ घेऊ शकतात. यामध्ये भाजपचे ११ ते १२ तर शिंदे गटातील ५ ते ७ आमदारांना संधी मिळू शकते. विशेष म्हणजे महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन होऊन दीड महिना उलटूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. यावरून विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर सातत्याने टीका होत आहे. संबंधित विभागाचे मंत्री व मंत्र्यांची नियुक्ती न झाल्याने सर्व कामेही रखडली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.