Cabinet Expansion: मंत्रिमंडळाचा विस्तार ही केवळ अफवा कारण...; राष्ट्रवादीच्या आमदाराचा दावा

मंत्रिमंडळाचा विस्तार जुलै महिन्यात होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिली आहे.
Cabinet Expansion
Cabinet ExpansionEsakal
Updated on

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार जुलै महिन्यात होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिली आहे. पण ही केवळ अफवा असून मंत्रिमंडळाचा विस्तार होणारच नाही, असा दावा राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. (Cabinet expansion is just a rumor because Shivsena BJP have internal problems says Amol Mitkari)

मिटकरी यांनी ट्विटद्वारे आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी म्हटलं की, "मंत्रिमंडळाचा विस्तार ही केवळ अफवा!! अंतर्गत कलहामुळं विस्तार होणार नाही. झालाच तर सरकार टिकणार नाही. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये शीत युद्धाची ठिणगी पडली आहे. लवकरच याचा ज्वालामुखी होईल" (Latest Marathi News)

Cabinet Expansion
Rain Update: जुलै महिन्यात पाऊस कसा असेल? हवामान खात्यानं दिली महत्वाची अपडेट

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरमध्ये शासकीय पुजा आटोपल्यानंतर तातडीनं दिल्लीकडं रवाना झाले होते. त्यांच्यापाठोपाठ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील दिल्लीला रवाना झाले होते. यावेळी दोघांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या बैठकीत केंद्रातील आणि राज्यातील मंत्रिमंडळविस्ताराबाबत चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. (Marathi Tajya Batmya)

Cabinet Expansion
Modi-Putin Talk: PM मोदी, पुतिन यांच्यात फोनवरुन चर्चा; 'या' महत्वाच्या विषयावर झाली चर्चा

पण नंतर फडणवीसांनी माध्यमांशी बोलताना आपल्याला केंद्रीय मंत्रिमंडळाबाबत माहिती नाही पण राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पुढील महिन्यात होईल, असं सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी देखील राज्यातील मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असल्याच्या चर्चेला दुजोरा दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.