Cabinet Expansion: रात्रभर अब्दुल सत्तार शिंदेंच्या बंगल्यावर चर्चा करत राहिले अन्...

अखेर शिंदे-फडणवीस सरकारचा बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तार पार पडला
Abdul Sattar
Abdul Sattaresakal
Updated on

शिंदे-फडणवीस सरकारचा बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तार अखेर आज (मंगळवारी) पार पडत आहे. राजभवनातील दरबार हॉलमध्ये हा सोहळा चालू आहे. मात्र, या शपथविधी सोहळ्यापूर्वी सोमवारी रात्री उशीरापर्यंत शिंदेच्या गोटात बैठका सुरु होत्या. मंत्रिमडळ विस्तारातील पहिल्या टप्प्यात एकनाथ शिंदे गटातील केवळ 9 आमदारांनाच संधी दिली गेली आहे.

2 दिवसपूर्वी टीईटी घोटाळ्यातील धक्कादायक माहिती समोर आल्यामुळे मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जाणारे अब्दुल सत्तार यांची आजची संधी हुकण्याची शक्यता दाट वर्तवण्यात येत होती. त्यामुळे शिंदे गटातील दुसऱ्या काही नेत्यांना मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात संधी मिळणार होती. त्यामुळे उर्वरित बंडखोर आमदार नाराज होण्याची भीतीही कायम होती. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे हे शेवटपर्यंत आपल्या सहकाऱ्यांशी बोलत असल्याचे दिसून आले होते रात्रभर चालणाऱ्या या बैठकांचा शेवट सकाळी नावांच्या यादीने झाला.

Abdul Sattar
Cabinet Expansion 2022: शिंदे समर्थक आमदार संजय शिरसाट नाराज, बैठकीतही खडाजंगी

एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील नंदनवन बंगल्यावर आज (मंगळवारी) पहाटे ५.३० वाजेपर्यंत खलबतं सुरु असल्याची माहिती समोर आली होती. पहाटे तीन वाजता एकनाथ शिंदे नांदेड दौऱ्यावरून बंगल्यावर परतले होते. त्यानंतर या बैठकीला सुरुवात झाली होती. पहाटे झालेल्या या बैठकीला शिंदे गटाचे १४ आमदार उपस्थित होते. यामध्ये दीपक केसरकर, दादा भुसे, महेश शिंदे, संजय शिरसाट, तानाजी सावंत, उदय सामंत आणि अब्दुल सत्तार या नेत्यांचाही समावेश होता. रात्री साडेतीन वाजेपर्यंत हे सर्व नेते मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्ताराबाबत चर्चा करत होते. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अब्दुल सत्तार यांना तुर्तास मंत्रिपदापासून दूर राहावे लागेल, असा संदेश देण्यात आल्याची शक्यता आहे असे बोलले जात होते. त्यामुळे शिंदेगटकडून नाराजीचे सुर उमटलेले दिसून येत होते. मात्र, एकनाथ शिंदे यांनी त्यांची समजूत कशाप्रकारे काढली असेल, याविषयीही अनेकांना उत्सुकता होती.

Abdul Sattar
Cabinet Expansion: मित्रपक्षांशिवाय सरकार चालत नाही; बच्चू कडूंचे मोठे वक्तव्य

पहाटे आटोपलेल्या या बैठकीनंतर शिंदे गटाचे आमदार पुन्हा एकदा सह्याद्री अतिथीगृहावर एकत्र आले. या ठिकाणी पुन्हा नावांबद्दल चर्चा झाली. या बैठकीत शिंदे गटातील मंत्रिपदाच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. आता मंत्रीमंडळ विस्तारामध्ये जाहीर झालेल्या यादीमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून अब्दुल सत्तरांच नाव समोर आलं आणि सर्व गोष्टीवरील पडदा उठला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.