Cabinet Decision: लाडका बांधकाम कामगार! इमारत कामगारांना मिळणार पाच हजार रुपये; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Vidhan sabha election 2024: वैजापूरच्या शनीदेवगाव बंधाऱ्यास प्रशासकीय मान्यता, राज्य शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित (महसूल), पाचपाखाडी येथील जमीन ठाणे मनपास प्रशासकीय भवनासाठी (महसूल), खिडकाळी येथील जमीन हायब्रिड स्किल विद्यापीठासाठी विनामूल्य (महसूल) राबवणार.
Shrigonda 532 crores road projects
CM Eknath shinde, Devendra Fadnavis, Ajit pawarsakal
Updated on

CM Eknath Shinde: विधासभेच्या निवडणुकांसाठी कोणत्याही दिवशी आचारसंहिता लागू शकते. मंगळवारी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकारने मागच्या दोन आठवड्यांपासून कॅबिनेट बैठकांचा सपाटा लावला होता. सोमवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत.

राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बांधकाम कामगारांसंबंधी मोठी घोषणा केली. इमारत कामगारांना पाच हजार रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याचे शिंदेंनी सांगितलं. या योजनेची सविस्तर माहिती अद्याप शासनाकडून देण्यात आलेली नाही.

मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले निर्णय

संक्षिप्त निर्णय

1. मुंबईतल्या ५ प्रवेश मार्गांवरील पथकर (टोल) हलक्या वाहनांसाठी माफ. आज रात्रौ १२ पासून अंमलबजावणी. (सार्वजनिक बांधकाम)

2. आगरी समाजासाठी महामंडळ (सामाजिक न्याय)

3. समाजकार्य महाविद्यालयांमधील अध्यापकांना करिअर ॲडव्हान्समेंट स्किम (उच्च व तंत्रशिक्षण)

4. दमणगंगा एकदरे गोदावरी नदी जोड योजनेस मान्यता (जलसंपदा)

5. आष्टी उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता (जलसंपदा)

6. वैजापूरच्या शनीदेवगाव बंधाऱ्यास प्रशासकीय मान्यता (जलसंपदा विभाग)

7. राज्य शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित (महसूल)

8. पाचपाखाडी येथील जमीन ठाणे मनपास प्रशासकीय भवनासाठी (महसूल)

9. खिडकाळी येथील जमीन हायब्रिड स्किल विद्यापीठासाठी विनामूल्य (महसूल)

10. राज्यात प्रधानमंत्री आवास योजना (शहरी ) २.० राबविणार

11. पुणे मेट्रो रेल टप्पा-२ मधील रेल्वे मार्गिंकांच्या कामांना मान्यता (नगर विकास)

12. किल्लारीच्या शेतकरी सहकारी कारखान्याचे कर्ज व्याजासह माफ (सहकार)

13. अडचणीतील सहकारी उपसा जलसिंचन योजनांचे थकीत कर्ज माफ (सहकार)

14. मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात इमर्जन्सी मेडिसिनची ३ पदे (वैद्यकीय शिक्षण)

15. खंड क्षमापित झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना (वैद्यकीय शिक्षण)

16. मराठी भाषेविषयक जनजागृतीसाठी पंधरवडा (मराठी भाषा)

17. अण्णासाहेब जावळे मराठवाडा विकास मंडळासाठी अभ्यासगट

18. उमेदसाठी अभ्यासगट (ग्राम विकास)

19. कौशल्य विद्यापीठास रतन टाटा यांचे नाव (कौशल्य विकास)

दरम्यान, सोमवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सरकारने महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास विद्यापीठाचे नाव बदलून “रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास विद्यापीठ” असे नामकरण केले आहे. भारतातील सर्वात प्रतिष्ठित उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 वर्षी 9 ऑक्टोबर 2024 रोजी निधन झाले. सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.