Call Center Scam : पालघरमध्ये बसून कॅनडातील नागरिकांना घालायचे गंडा; बनावट कॉल सेंटर चालवणारी गँग ताब्यात

मेगाविला नावाच्या इमारतीत हे फेक कॉल सेंटर थाटलं होतं.
Call Center Scam
Call Center ScameSakal
Updated on

बनावट कॉल सेंटरच्या माध्यमातून कॅनडामधील नागरिकांची फसवणूक करणाऱ्या एका टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. पालघरमधील वाडा तालुक्यातून हे मोठं रॅकेट चालत होतं. मेगाविला नावाच्या इमारतीत हे फेक कॉल सेंटर थाटलं होतं. शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली.

ठाणे पोलिसांनी ही कारवाई करत तब्बल २५ जणांना अटक केली आहे. यामध्ये २३ जणांच्या टोळीसह, इमारतीच्या दोन मालकांचाही समावेश आहे. मेगाविला नावाच्या इमारतीतील सहा फ्लॅटमध्ये हे अनधिकृत कॉल सेंटर चालवलं जात होतं.

Call Center Scam
डिजिटल पेमेंट करताना भीती वाटते? ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी या टिप्स फॉलो करा

अशी करायचे फसवणूक

कॉल सेंटरवरील आरोपी हे कॅनडामधील नागरिकांचे मोबाईल नंबर, नाव, पत्ता अशी माहिती बेकायदेशीरपणे मिळवत होते. यानंतर ते या नागरिकांना कॉल करून, आपण अमेझॉनवरून बोलत असल्याचं सांगत. नागरिकांनी जी वस्तू मागवलीच नाही, त्याच्या डिलिव्हरीबाबत ते माहिती देत. नागरिकांचा पत्ता सांगून ते त्यांचा विश्वास संपादन करत. (Call Center Scam)

आपण असं काही मागवलं नसल्याचं म्हणताच, ऑर्डर कॅन्सल करण्यासाठी १ प्रेस करा असं ते नागरिकांना सांगत. १ बटण दाबताच हा कॉल यांच्याच टोळीतील दुसऱ्या व्यक्तीकडे ट्रान्सफर केला जाई. यामध्ये अमेझॉनचे अधिकारी असल्याचं सांगत, ती व्यक्ती नागरिकांना कायदेशीर कारवाईची धमकी देत. यानंतर ऑर्डर कॅन्सल करण्यासाठी बिटकॉईनच्या माध्यमातून काही रक्कम या नागरिकांकडून उकळण्यात येत होती.

Call Center Scam
Daam Virus : सावधान! थेट कॉल लॉग आणि कॅमेरा हॅक करतोय हा व्हायरस, केंद्रीय यंत्रणांनी दिला धोक्याचा इशारा

विविध अ‍ॅप्सचा वापर

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे आरोपी एक्स लाईट, आयबीम आणि एक्स-टेन अशा विविध अ‍ॅप्सचा वापर करत होते. या माध्यमातून ते कॅनडातील नागरिकांची माहिती मिळवत. तसंच, नागरिकांना धमकावण्यासाठी त्यांना विशिष्ट स्क्रिप्टही देण्यात आली होती. आपला आवाज ओळखू नये यासाठी हे आरोपी रोबोटिक व्हॉईस तयार करणाऱ्या अ‍ॅप्सची मदत घेत होते.

या रॅकेटमध्ये आणखी चार लोक सहभागी असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या चौघांचा शोध सुरू आहे. तसंच, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती वाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुरेश कदम यांनी दिली.

Call Center Scam
Fake NGO Scam : जखमी पक्ष्याची मदत करणं पडलं महागात; मुंबईतील महिलेला बसला एक लाखांचा चुना!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()