Winter Session: अजित पवारांचे पुणेरी चिमटे, मंत्री उदय सामंत यांना जवळ बोलावत म्हणाले…

अजित पवार जे उदय सामंत यांना म्हणाले तो संवाद व्हायरल
Ajit Pawar,Uday Samant
Ajit Pawar,Uday Samant esakal
Updated on

राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. नेते एकमेकांवर आगपाखड करत आहेत, कोणी कोणावर घोटाळ्याचे आरोप करतंय, तर कोणी कोणाच्या गुन्ह्यांचा पाढा वाचतंय. विधानसभेतलं वातावरण तापलंय. महागाई, बेरोजगारी, रस्ते, कोरोना, सीमाप्रश्न या शब्दांनी जे भवन दणाणलं जायला हवं होतं, तिथं शिळ्या कढीला उत आणला जातोय. (Ajit Pawar,Uday Samant)

मात्र विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अजित पवार कायमच आपल्या आक्रमक, सडेतोड बोलण्यातून ओळखले जातात. ते कायमच विरोधी नेत्यांवर आपल्या आक्रमक शैलीत कोंडीत पकडताना दिसून येतात. परंतु यावेळी त्यांची एक वेगळीच झलक दिसून आली आहे.

भाजप नेते व मंत्री अतुल आणि अजित पवार समोरासमोर आले तेव्हा अजित पवार आपल्या खास अंदाजात अतुल सावे यांना म्हणतात की, "सावे साहेब तुम्ही मंत्री झाल्यापासून तुम्ही इतके बदलला आहात की, मी देवेंद्रजींना अनेकदा सांगतो की, सावे साहेबांना सांगा इतकं तुटक तुटक नसतं राहायचं. त्यानंतर शुक्रवारी अजित पवार कार्यकर्त्यांसोबत फोटो काढत होते.

Ajit Pawar,Uday Samant
Jaykumar Gore Accident : कठडा तोडून गाडी नदीपात्रात कोसळली; गोरेंच्या डोक्याला गंभीर दुखापत

राज्यभरातून आलेले कार्यकर्ते अजित पवार यांच्यासोबत फोटो काढत होते. त्याचवेळी शिंदे गटाचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत त्याठिकाणहून जात होते तेवढ्यात अजित पवार यांनी बोलावून घेतलं.

कार्यकर्त्यांना बाजूला सारत म्हणाले आता आमच्या दोघांचाच फोटो काढा, अजित पवार यांनी उदय सामंत यांच्या खांद्यावर हात टाकून फोटो काढला. त्यानंतर अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत सामंत यांना म्हणाले आता आता हा फोटो बघून एकनाथराव… आणि तेथे चांगलाच हशा पिकला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.