Ramesh Kadam : तुरुंगातून बाहेर आल्यानंतर सर्वच पक्षांकडून बोलावणं, पण...; रमेश कदमांचं विधान

Ramesh Kadam
Ramesh Kadam
Updated on

मुंबई - राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम यांचं तुरुंगातून सुटून आल्यानंतर सोलापुरमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं होतं. पहिल्यांदाच ते मोहोळ मतदारसंघात आले. त्यांना भेटण्यासाठी युवकांनी प्रचंड गर्दी केली होती. ते मोहोळचे माजी आमदार होते. आता त्यांनी आपल्या राजकीय भूमिकेबद्दल मोठं विधान केलं आहे.

Ramesh Kadam
Pankaja Munde: पंकजा मुंडेंना धक्का! वैद्यनाथ सहकारी कारखान्याची 19 कोटी रुपयांची मालमत्ता केली जप्त

कदम म्हणाले की, मी जेलमधून बाहेर आल्यापासून अनेक राजकीय पक्षातील नेत्यांचे मला फोन आले आणि बोलावणे आले आहे. आमच्याकडे या आम्ही तुम्हाला मदत करू,परंतु मी सर्वांना हेच सांगितले की मतदारसंघातील जनतेशी चर्चा करूनच निर्णय जाहीर करणार आहे. आपण पुन्हा मोहोळ विधानसभेची आमदारकीची निवडणूक लढणार असल्याचा निर्धार माजी आमदार रमेश कदम व्यक्त केला.

Ramesh Kadam
Honey Bee Attack: अंत्ययात्रेत सहभागी झालेल्यांवर मधमाशांचा हल्ला, 200 जण जखमी

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी मागील आठ वर्षे जेलमध्ये असणारे माजी आमदार रमेश कदम यांना उच्च न्यायालयाने मागील महिन्यात जामीन मंजूर केला आहे. यानंतर त्यांनी रॅली काढली.

दरम्यान मला उच्च न्यायालयाने कायमचा जामीन दिला आहे. त्यामुळे मी आता पुन्हा मतदारसंघात कायमस्वरूपी येणार असून, महिन्यातील पंधरा दिवस मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी वेळ देणार असल्याचं कदम यांनी म्हटलं. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना कदम यांनी म्हटलं की, सत्तेसाठी काहीही करणारी माणसं आपण पाहतोय. मात्र, आठ वर्षांपूर्वी आठ महिन्याच्या कामातून आपल्या भरपूर प्रेम मिळाल्याचं ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.