'लव्ह जिहाद'च्या कचाट्यात कुणी सापडलं असेल, त्यांनी आमच्याशी संपर्क करा : नवनीत राणा

'हनुमान चालीसाचं पठण केलं, त्यामुळं आम्हाला ठाकरे सरकारनं जेलमध्ये टाकलं होतं.'
Navneet Rana vs Love Jihad
Navneet Rana vs Love Jihadesakal
Updated on
Summary

'हनुमान चालीसाचं पठण केलं, त्यामुळं आम्हाला ठाकरे सरकारनं जेलमध्ये टाकलं होतं.'

जळगाव : सध्या देशात 'लव्ह जिहाद'चा मुद्दा चांगलाच गाजताना दिसतोय. याच पार्श्वभूमीवर खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी देखील या प्रकरणी लक्ष घातलं असून मुलींना त्यांनी आवाहन केलंय. अमरावती जिल्ह्यातील (Amravati District) ज्या मुली लव्ह जिहादच्या कचाट्यात सापडल्या आहेत. त्यांच्याशी संपर्क करून त्यांना आणि कुटुंबीयांना मदत करण्याचं काम सुरूय. येणाऱ्या काळात लव्ह जिहादच्या (Love Jihad) विरोधात आम्ही मोठी मोहीम उभारणार आहोत, असं स्पष्ट संकेत खासदार राणा यांनी दिले आहेत.

राज्यात ज्या-ज्या ठिकाणी लव्ह जिहादच्या कचाट्यात कुणी सापडलं असेल त्यांनी आमच्याशी संपर्क करावा. त्यांना मदत करण्याचं काम आम्ही करू, असंही त्या म्हणाल्या आहेत. जळगाव (Jalgaon) शहरात खासदार नवनीत राणा व त्यांचे पती रवी राणा दाम्पत्याचा हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) पठणाचा कार्यक्रम झाला.

Navneet Rana vs Love Jihad
BJP : अशोक चव्हाणांसह विश्वजीत कदम भाजपमध्ये जाणार? प्रवेशावर काँग्रेस नेत्याचं स्पष्टीकरण

यापूर्वी राणा दाम्पत्यानं मंडळाच्या बाप्पाच्या दर्शन घेत आरती केली. यानंतर माध्‍यमांशी संवाद साधताना खासदार राणा बोलत होत्‍या. आमच्या कणाकणात हनुमानजी आहेत. त्यामुळं हनुमान चालीसाचं पठण करून राज्यावरचं संकट दूर करणं हा आमचा हेतू होता. हनुमान चालीसाचं पठण केलं. त्यामुळं आम्हाला ठाकरे सरकारनं जेलमध्ये टाकलं होतं. आम्ही निर्दोष होतो तरी आम्हाला 14 दिवस जेलमध्ये राहावं लागलं, असं सांगत राणांनी ठाकरे सरकारवर टीका केली.

Navneet Rana vs Love Jihad
Shiv Sena : अमित शाह ठाकरेंवर टीका करत असतील तर ही चिड येणारी बाब; खैरेंचा पलटवार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()