परीक्षा महाराष्ट्राची अन् केंद्र उत्तरप्रदेशात! भोंगळ कारभार

आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभारामुळे परीक्षार्थींचा गोंधळ
 examination
examinationGoogle
Updated on

पुसद (जि. यवतमाळ) : महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागातर्फे घेण्यात येणाऱ्या ‘ग्रुप डी’ पदांसाठीच्या लेखी परीक्षा येत्या रविवारी (ता. २६) असून या परीक्षांचे प्रवेशपत्र तीन दिवस आधी पाठविण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील अनेक परीक्षार्थींना उत्तर प्रदेशातील नोएडा परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभारामुळे परीक्षार्थींचा गोंधळ उडाला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभागातील ‘ग्रुप डी’ साठी स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी शासनाने मे. न्यास कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला परीक्षा घेऊन उमेदवार निवडीचा अधिकार दिला आहे. महाराष्ट्रातील उमेदवारांना त्यांच्या रहिवासी जिल्ह्यातील परीक्षा केंद्र निवडण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला होता. त्यानुसार उमेदवारांनी अर्ज भरताना त्यांच्या जिल्ह्यातील सोयीचे केंद्र भरले. परंतु, महाराष्ट्रातील उमेदवारांना उत्तर प्रदेशातील परीक्षा केंद्र ॲडमिशन कार्ड वर आलेले पाहून परीक्षार्थींची अक्षरशः भंबेरी उडाली आहे.

 examination
Video: स्वतःचा मास्क काढून दुसऱ्याला घातला; ज्योतिरादित्य झाले ट्रोल

पुसद तालुक्यातील पार्डी येथील परमेश्वर रमेश कोल्हेकर या उमेदवाराने वाशीम जिल्ह्यातील परीक्षा केंद्राचा पर्याय दिला होता. मात्र त्याला उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडा येथील आरकेएम सेकंडरी अँड हायर सेकंडरी स्कूल हे परीक्षा केंद्र मिळाले. ही परीक्षा कशी द्यावी, असा विचार सुरू असतानाच दोन तासानंतर नवीन ॲडमिशन कार्ड ऑनलाइन मिळाले. त्यात केंद्रात बदल होऊन आरकेएम सेकंडरी अँड हायर सेकंडरी स्कूल, कलवन असे परीक्षा केंद्र दर्शविण्यात आले. त्यातही पिनकोड चुकीचा देण्यात आला.

असाच प्रकार दत्ता रामेश्वर पातुरकर या उमेदवाराच्या बाबतीतही घडला. त्यालाही नोएडा परीक्षा केंद्र देण्यात आले. परीक्षा केंद्रातील या गोंधळामुळे उमेदवार परीक्षा कशी आणि कुठे द्यायची, असा प्रश्न निर्माण झाला असून आरोग्य विभागाचा हा सावळागोंधळ उमेदवारांच्या नोकरीवर उठला आहे. ही परीक्षा तातडीने रद्द करावी,अशी या उमेदवारांची मागणी आहे.

विशेष म्हणजे आरोग्य विभागाच्या ‘सी ग्रुप’ची परीक्षाही येत्या शनिवारीच (ता. २५) आहे. त्यामुळे सी व डी ग्रुपमधील पदांसाठी अर्ज भरलेल्या उमेदवारांची वेगवेगळ्या जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांमुळे दोन्ही परीक्षा देण्याची संधी हुकणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.