Accident News: शिंदे गटाच्या मेळाव्याला जाताना गाडीचा अपघात; एकाचा मृत्यू ३ जण जखमी

शिवसेना शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी अनेक नेते, पदाधिकारी, शिवसैनिक मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.
Accident News
Accident NewsEsakal
Updated on

शिवसेना शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी अनेक नेते, पदाधिकारी, शिवसैनिक मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. याच मेळाव्यासाठी मुंबईला जात असताना शिवसैनिकांच्या गाडीला अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एका कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे. तर ३ जण जखमी झाले आहेत.

कवटेमहाकांळ तालूक्यातून जात असताना रत्नागिरी नागपूर महामार्गावरील शिरढोण गावाजवळ हा अपघात झाला आहे. एका ट्रकने पदाधिकाऱ्यांच्या गाडीला मागून धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. शिंदे गटाच्या युवासेनेचे पदाधिकारी होते अशी माहिती समोर आली आहे.

Accident News
Gujarat Bridge Collapse: गुजरातमध्ये निर्माणाधीन पूल कोसळल्याने मोठी दुर्घटना, 2 जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्याचे चौकशीचे आदेश

विवेक सुरेश तेली ( वय४२) रा. विद्यानगर कवठेमहांकाळ असे मृत व्यक्तीचे नाव असून महेश शिवाजी सूर्यवंशी ( वय३०) रा. कवठे महांकाळ, संदीप शिंत्रे (वय४०), सुभाष कूनुरे(वय ५५) दोघे रा. हिंगणगाव ता.कवठे महांकाळ, प्रसाद सूर्यवंशी रा. कवठे महांकाळअशी जखमीची नावे आहेत आहेत. हा अपघात आज (मंगळवारी) पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चार चाकी वाहन (क्रमांक एम. एच.१० ए.जी.४३२०) चार चाकी वाहनातून कवठे महांकाळ येथून मुंबई येथे होणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना दसरा मेळाव्यासाठी निघाले होते.

Accident News
Dasara Melava: दसऱ्याच्या मुहूर्तावर आज महाशक्तिप्रदर्शन, चार मेळाव्यांमध्ये धडाडणार तोफा; कोण काय बोलणार याकडे लक्ष

दरम्यान, रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव हद्दीमधील करपे हायस्कूलच्या समोर आले असता पाठीमागून गोपाळपूर येथून मिरज तालुक्यातील काननवाडी कडे निघालेला दुधाचा टँकर (क्रमांक एम.एच.१० झेड ४४८१) याची चार चाकी वाहनाला पाठीमागून जोराची धडक बसली यामध्ये चार चाकीवाहनाच्या मध्यभागी बसलेला विवेक सुरेश तेली ( वय४०) रा. विद्यानगर कवठेमहांकाळ याचा मिरज येथील शासकीय रुग्णालयातउपचार सुरू असताना मृत्यू झाला.

तर इतर ३ जण जखमी झालेत. जखमींवर मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिस घटनेचा आधिक तपास करत आहेत.

दसरा मेळाव्याची जोरदार तयारी

आझाद मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मेळावा होत आहे. दादर शिवाजी पार्कवर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली दसरा मेळावा होणार आहे. या दोन्ही मेळाव्यांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. या दसरा मेळाव्यासाठी एक लाखांहून अधिक कार्यकर्ते येतील, असा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com