Laddu Mutya Baba: लड्डू मुत्या बाबा अडचणीत? गुन्हा दाखल होण्याची शक्यता

Laddu Mutya Baba viral video: बाबाचे रिल्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा बाबा हाताने पंखा बंद करतो आणि त्यामुळे आजार बरे होतात, असा दावा केला जातो.
Ladu Mutya Baba
Ladu Mutya Baba
Updated on

Ladu Mutya Baba News- गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक बाबा आणि त्याचे गाणे प्रसिद्ध होत आहे. हा बाबा कर्नाटकातील असून त्याचे नाव लड्डू मुत्या असं आहे. या बाबाचे रिल्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा बाबा हाताने पंखा बंद करतो आणि त्यामुळे आजार बरे होतात, असा दावा केला जातो. याप्रकरणी आता अंधश्रद्धा निर्मूलन समिती आक्रमक झाली आहे.

कर्नाटकातील लड्डू मुत्या बाबावर कर्नाटक सरकारने गुन्हा दाखल करावा. अंधश्रद्धा निर्मूलन समिती कर्नाटकातही आहे. लोकांना फसवण्याचे काम लड्डू मूत्या बाबा करत आहेत. हाताने पंखा बंद करणे आणि त्यामुळे आजार बरे होतील अशी अंधश्रद्धा बाबा पसरवत आहे. त्यामुळे त्याच्यावर कारवाई व्हायला हवी, असं अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मिलिंद देशमुख म्हणाले आहेत.

Ladu Mutya Baba
Laddu Mutya Swami : हाताने फॅन थांबवून प्रसाद देणारा लाडू मुत्या बाबा आहे तरी कोण?

लड्डू मुत्या बाबा चांगलाच फेमस होत आहे. त्याच्यावर बनवण्यात आलेले गाणे मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचत आहे. लोक देखील या गाण्यावर रील्स बनवत आहेत. सदर बाबा हा सुरु असलेला फॅन हाताने बंद करतो असा दावा केला जातो. व्हिडिओमध्ये तसं दाखवलं जातं आहे. बाबा ज्याच्या डोक्याला हात लावतो त्याचे आजार बरे होतात असा देखील दावा केला जातो.

Ladu Mutya Baba
Pune Viral Video: कारची काच खाली करायला सांगितलं.. लाथा घातल्या; ऑटोरिक्षा चालकाच्या दादागिरीचा व्हिडिओ व्हायरल

लड्डू मुत्या बाबा आणि त्याचे भक्तगण अंधश्रद्धा पसरवत आहेत. कोणताही आजार अशा माध्यमातून बरा होत नसतो. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने बाबावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी कर्नाटकमधील अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि कर्नाटक सरकार काय कारवाई करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.