Abdul Sattar: कृषीमंत्री अब्दुल सत्तारांवर गुन्हा दाखल; निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याचं तपासात उघड

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अडचणींत वाढ
Abdul Sattar
Abdul Sattaresakal
Updated on

राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असतानाच दुसरीकडे राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रामध्ये खोटी माहिती दिल्याप्रकरणी अब्दुल सत्तार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिल्लोड न्यायालयाच्या तपासातून ही माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News)

अब्दुल सत्तार यांनी 2014 आणि 2019 वेळीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाला संपत्तीबाबत खोटी माहिती दिली असल्याचे पोलीस तपासात उघड झालं आहे. 2014 रोजी खरेदी केलेली जमिनीला, त्याच्या किमतीमध्ये 2019 ला जास्तीची किंमत दाखवण्यात आली आहे.  (Marathi Tajya Batmya)

Abdul Sattar
Deepak Kesarkar : '..तर दीपक केसरकर भाजपमध्ये जातील'; ठाकरे गटाच्या प्रवक्त्याचा मोठा गौप्यस्फोट

अशाच एकूण 4 ते 5 मालमत्तांसंदर्भात देण्यात आलेल्या माहितीत तफावत असल्याचं न्यायालयीन तपासामध्ये आढळून आलं आहे. त्यामुळे सिल्लोड न्यायालयाकडून या प्रकरणात खटला चालवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणी सिल्लोडमधील सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपल्ली यांनी 2021मध्ये याचिका दाखल केली होती. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिस तपासामध्ये ही माहिती समोर आली आहे. (Marathi Tajya Batmya)

Abdul Sattar
N Chandrasekaran : टाटांच्या अध्यक्षांनी बनवला महाराष्ट्राच्या प्रगतीचा रोडमॅप, अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द

दरम्यान अब्दुल सत्तार यांनी 2014 आणि 2019 मध्ये निवडणूक आयोगाला सादर केलेल्या शपथपत्रात मालमत्तेच्या माहितीत तफावत आहे, हे मान्य करत सिल्लोडच्या न्यायालयाने सत्तारांच्याविरोधात फौजदारी खटला चालवण्याचे आदेश काल (बुधवारी) दिलेत. हे आरोप सिद्ध झाल्यास अब्दुल सत्तार यांना मोठा धक्का बसणार आहे. आरोप सिध्द झाल्यास अब्दुल सत्तार यांची आमदारकी जाईल. त्याशिवाय 6 वर्ष निवडणूक लढण्यासही ते अपात्र ठरतील. याबाबतचे वृत्त 'एबीपी माझा'ने दिले आहे.(Latest Marathi News)

Abdul Sattar
Weather Update : राज्याच्या काही भागात पावसाची हजेरी, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

काय आहे प्रकरण?

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या सन 2014, 2019 सिल्लोड, सोयगाव विधानसभा निवडणूक प्रतिज्ञापत्रात शेतकीय जमीन, बिगर शेतकी जमीन, वाणिज्य इमारती, निवासी इमारती, शिक्षण विषयी खोटी माहिती दिली होती. दोन्हीवेळी दिलेल्या माहितीत तफावत आढळून येत आहे. काही जमिनीचे मूल्य कमी दाखवण्यात आले आहे. तर काही मालमत्ता दाखवण्यातच आलेल्या नाहीत, अशी याचिका सिल्लोड न्यायालयात दाखल करण्यात आली होती. (Marathi Tajya Batmya)

सामाजिक कार्यकर्ते महेश शकरलाल शंकरपेल्ली, पुण्यातील डॉ. अभिषेक हरिदास यांनी दिनांक 27/10/2021 रोजी याचिका दाखल केली होती. या प्रकरणी दीड वर्षे सत्यता पडताळणी करण्यात आली. याबाबत सत्तार यांचा जबाबही नोंदवला. 11 जुलै रोजी न्यायाधीश मीनाक्षी धनराज यांनी सत्तारांविरुद्ध प्रथमदर्शनी पुरावे असल्याचं मान्य करत फौजदारी खटला चालवण्याचे आदेश दिले आहे.(Latest Marathi News)

Abdul Sattar
Kolhapur Politics : शिवसेना, राष्ट्रवादीमधील फूट कुणाच्या पथ्यावर? 'या' नेत्यांची भूमिका ठरणार निर्णायक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.