मुंबईः सत्तारूढ पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांनी लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची जीभ छाटण्यासाठी बक्षीस जाहीर केल्यानंतर काँग्रेस पक्ष आक्रमक झाला असून गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी पक्षाच्या वतीने करण्यात आली होती. अखेर गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.