Shashikant Shinde: मार्केट FSI घोटाळा प्रकरणी शशिकांत शिंदेंवर गुन्हा दाखल; निवडणुकीच्या तोंडावर कारवाईची शक्यता

काय आहे हा नवा घोटाळा सविस्तर जाणून घ्या
Shashikant Shinde
Shashikant Shindeesakal
Updated on

नवी मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शशिकांत शिंदे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सुरुवातीला शौचालय ८ ते १० कोटींच्या कथित घोटाळा प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर आता कृषी उत्पन्न बाजार समितीतील एफएसआय घोटाळा प्रकरणी त्यांच्यावर नवा गुन्हा दाखल झाला आहे. मुंबईतील APMC पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. साम टिव्ही न्यूजनं याबाबत वृत्त दिलं आहे. (case registered against Shashikant Shinde in market FSI scam may action be taken on ahead of Lok Sabha election)

Shashikant Shinde
Shiv Sangram: 'शिवसंग्राम' विधानसभेच्या 12 जागा लढवणार, लोकसभेची रणनीती काय? ज्योती मेटेंनी स्पष्ट केली भूमिका

शौचालय घोटाळ्याप्रकरणी शशिकांत शिंदे यांना अटकपूर्व जामीन मिळाल्यानं त्यांची अटक टळली होती. पण इतर काही संचालकांवर अटकेची कारवाई झाली होती. पण आता मसाला मार्केटमधील १३८ कोटींचा घोटाळा समोर आला आहे. (Marathi Tajya Batmya)

या घोटाळ्याची चौकशी मार्केटची प्रशासक मनोज सैनिक यांनी या प्रकरणाचा अहवाल तयार केला. यामध्ये ६५ कोटींच्या एफएसआयमध्ये फसवणूक झाल्याचा दावा केला आहे. सन २००९ पासून या प्रकरणाची चौकशी सुरु होती पण यात गुन्हा दाखल होत नव्हता.

Shashikant Shinde
Earthquake Japan: जपानच्या बोनिन बेटावर भूकंपाचे झटके; त्सुनामीचा धोका असणार का?

पण काल रात्री एपीएमसी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. दरम्यान, १२ एप्रिल रोजी शशिकांत शिंदे यांनी कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. त्यामुळं या प्रकरणात कोर्ट काय निकाल देतंय हे महत्वाचं आहे. (Latest Marathi News)

Shashikant Shinde
Lok Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे पहिल्यांदाच काँग्रेसला देणार मत; मतदानापूर्वी केली मोठी घोषणा

दरम्यान, शशिकांत शिंदे हे सातारा लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. त्यांचा सामना महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्याशी होणार आहे. त्यामुळं निवडणुकीच्या तोंडावर या गोष्टी घडवून आणल्या जात असल्याचा आरोप करत तुम्ही कितीही दबाव आणण्याचा प्रयत्न करा पण आपण शरद पवारांची साथ सोडणार नाही, अशी भूमिका शशिकांत शिंदे यांनी मांडली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.