राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयकडून गुन्हा दाखल करम्यात आला आहे. अनिल देशमुख हे १०० कोटी खंडणी वसूली प्रकरणात सध्या जामीनावर बाहेर आहेत. यादरम्यान त्यांच्यावर सीबीआयकडून आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. अनिल देशमुख यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत याबद्दल माहिती दिली असून यामध्ये देशमुखांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्यावर गंभीर आरोप केले आहेत.