पुणे, ता. ८ : भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न केल्याबाबत केंद्रीय अन्वेषण (सीबीआय) विभागाने तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख, विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण, तत्कालीन पोलिस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड, निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त सुषमा चव्हाण आणि विजय पाटील यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात सादर केलेल्या पेन ड्राईव्हवरुन सीबीआयने हा गुन्हा दाखल केला आहे.